हिंदूंची कुत्र्याशी तुलना करणाऱ्या मुफ्तीला कट्टरपंथींकडून सुटकेची मागणी!

02 Sep 2024 14:01:11

Mufti Salman Azhar 
 
लखनऊ : बरेली येथे कट्टरपंथींनी द्वेश निर्माण करणारे कृत्य केले आहे. कट्टरपंथी जमावाने हिंदूं धर्माची कुत्र्यासोबत तुलना करणाऱ्या कट्टरपंथी मुप्फी सलमानच्या सुटकेची मागणी केली. भडखाऊ भाषण करणाऱ्या मुफ्तींच्या सुटकेसाठी कट्टरपंथींनी प्रार्थना केली. यावेळी बड्या मौलवींनी सलमान अजहरील पाठिंबा दिला. ही घटना अला हजरत दर्गाह येथील उर्स-ए-राजवी येथे ३० ऑगस्ट रोजी घडली आहे.
 
प्रसारमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, बरेलीच्या हजरत दर्गाह येथे उर्स-ए-राजवी दरम्यान घडली होती. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस आला हजरत दर्गाह येथे उर्स-ए-राजवीचे आयोजन करण्यात आले होते. त्याठिकाणी बाहेरील देशातून आलेल्या मुस्लिम बांधवांचा मोठ्या संख्येने जमाव जमला होता. यावेळी संबधित जमावाने उर्दू भाषेतील बॅनर झळकवले होते. त्यात अजहरीची लवकरात सुटका करावी अशी मागणी करण्यात आली होती. यावेळी उपस्थित मौलवींनीही मुफ्तीला लवकरात लवकर सुटका करावी अशी मागणी केली. त्यासाठी काही मौलवींनी घटनास्थळी नमाज अदा केली. 
 
मुफ्ती सलमान अजहरी हे फेब्रुवारी २०२४ पासून गुजरात येथील तुरूंगात आहेत. ३१ जानेवारी २०२४ मध्ये गुजरात येथील जुनागड येथे एका कार्यक्रमात मुफ्तीने बोलताना हिंदूबाबत बेताल वक्तव्य केले होते. त्यांनी हिंदूंची तुलना थेट कुत्र्यासोबत केली होती.
 
नेमके काय म्हणाला मुफ्ती सलमान अजहर?  
 
"मुस्लिमांनी घाबरू नका, आपल्यावर अल्लाहची महिमा आणखी आहे", असे अजहरी म्हणाला होता. "इस्लाम अद्यापही जिवंत आहे. कुराण अद्यापही आहे. यांना काय वाटते ही लोकं आपल्यासोबत वाद निर्माण करतात. अजूनही घोडेमैदान फार दूर नाही. आज कुत्र्यांची वेळ आहे. उद्या आपली वेळ येईल, असे मुफ्ती सलमान अजहरीने वादग्रस्त वक्तव्य केले होते.
मुफ्ती सलमान अजहरीने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावेळी त्याला गुजरात येथून ताब्यात घेतले. त्यांनी योगी आदित्यनाथ यांच्याविषयी खालच्या भाषेत वक्तव्य केले होते. आरोपीविरोधात केवळ उत्तर प्रदेश नाहीतर महाराष्ट्र आणि कर्नाटकातही अनेक एफआरआय दाखल करण्यात आल्या आहेत.
 
Powered By Sangraha 9.0