लालबागमध्ये बस अपघात; नऊ जखमी ,एका तरुणीचा मृत्यू

02 Sep 2024 14:07:13
Lalbaug Bus Accident

मुंबई : मुंबईतील लालबाग परिसरात गणशोत्सवात सजावटीच्या साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी असते. त्यात दि. १ सप्टेंबर रोजी रात्री बेस्ट बसने रस्त्यावरील ९ नागरिकांना धडक दिली. त्यापैकी पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून तिघांवर उपचार सुरु आहेत. मात्र या अपघातात जखमी झालेल्या एका तरुणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यात या बसमधील एका मद्यधुंद प्रवाशामुळे हा अपघात झाल्याचं बोललं जातयं. दरम्यान बस चालकावर कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

काळाचौकी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बेस्ट बस नंबर ६६ (दक्षिण मुंबईतील बॅलार्ड पियर येथून सुटणारी इलेक्ट्रिक बस) सायनवरून राणी लक्ष्मीबाई चौक या बस थांब्याच्या दिशेने जात होती. त्यावेळीच हा अपघात घडला. या बेस्ट बसमध्ये एका मद्यधुंद प्रवाशाचं चालकाबरोबर भांडण झाले. त्यावेळी त्या प्रवाशाने चालकाशी हुज्जत घातली. त्याचदरम्यान मद्यधुंद प्रवाशाने बसचे स्टीअरिंगचा ताबा मिळवण्याचा आणि चालकाला बाजूला ढकलण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे बेस्ट बस चालकाचा बसवरील नियंत्रण सुटले. त्यात बसचे स्टीअरिंग मद्यधुंद प्रवाशाने वळवल्याने बस वाहन आणि पादचाऱ्यांना जाऊन धडकली. या अपघातात ९ जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मात्र अपघात एका तरुणीचा मृत्यू झाला. ज्यामुळे याप्रकरणी मद्यधुंदी प्रवाशाला ताब्यात घेण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0