मुंबई : लाडकी बहिण योजनेच्या लाभ वितरणाचा दुसरा टप्पा पार पडला असून लाखों महिलांच्या खात्यात ३ हजार रुपये जमा झाले आहेत. दरम्यान, ज्या महिलांना अद्याप पैसे मिळाले नाहीत त्यांच्या खात्यात लवकरच तीन महिन्यांचे ४ हजार ५०० रुपये जमा होणार आहेत.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजने अंतर्गत राज्यातील पात्र महिलांना दरमहा १५०० रूपये मिळणार आहेत. आतापर्यंत दोन टप्प्यांत या लाभाचे वितरण करण्यात आले आहे. ३१ ऑगस्ट रोजी लाखों महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून ३ हजार रुपये जमा करण्यात आले.
हे वाचलंत का? - "ज्यांनी हिंदुत्व सोडले त्यांना..."; चित्रा वाघ यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
परंतू, ज्या महिलांना अजूनही पैसे मिळाले नाहीत, त्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही. लवकरच त्यांच्यादेखील खात्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तीन महिन्यांचे मिळून ४ हजार ५०० रूपये जमा होणार आहे. तसेच ज्या महिलांना मागील दोन महिन्यांचे पैसे मिळालेत त्यांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याचे पैसे जमा होणार आहेत.