इमर्जन्सी चित्रपटात खलिस्तानी शब्द वापरल्याने प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली

02 Sep 2024 15:39:30
 
Kangana Ranaut Emergency Movie Khalistan
 
नवी दिल्ली : अभिनेत्री कंगना राणौतच्या इमर्जन्सी चित्रपटात (Emergency Movie) खलिस्तान शब्द वापरल्याने सेन्सॉर बोर्डाने चित्रपटाला मंजुरी दिलेली नाही. यामुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली गेली आहे. हा चित्रपट आणीबाणी आणि इंदिरा गांधींच्या जीवनावर आधारित आहे. अभिनेत्रीने एका युट्यूब चॅनेलशी बोलताना आपले मत व्यक्त केले. खलिस्तानी या एका शब्दामुळे शीखांच्या भावना दुखावल्या जातील असे म्हणणे आहे.
 
यावेळी बोलताना कंगना म्हणाली की, विरोधकांचे हेच मुद्दे आहेत त्यांनी याचिका दाखल करून चित्रपट थांबवण्याचा प्रयत्न केला. कंगना राणौत पुढे म्हणाली की, अशा लोकांना त्यांच्या अस्तित्वाबाबत समस्या असू शकते. अशी लोकं का जिवंत आहेत, हा चित्रपट कोणत्याही एका पक्षासाठी किंवा, समाजासाठी निर्मित केलेला नसून अतिशय प्रामाणिकपणे चित्रपटाची निर्मीती केली असल्याचे अभिनेत्रीने सांगितले आहे.
 
 
 
कंगना राणौत म्हणाली की, ज्या गोष्टींवर आक्षेप आहे तो चित्रपटातील एक भाग आहे. त्यावरून हा गोंधळ निर्माण करण्याचे काम सुरू आहे. कंगणा राणौत म्हणाली की, सेन्सॉर बोर्डाने आमच्या चित्रपटाला प्रमाणपत्र दिलेले नाही. मात्र आम्ही चित्रपटाची निर्माती करत राहू असे कंगणा म्हणाली होती. चित्रपटाला अद्यापही सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिली नाही. मात्र चित्रपट प्रदर्शसाठी मी कोर्टात लढेल, असे कंगना म्हणाली.
Powered By Sangraha 9.0