मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Attack on Visarjan Miravnuk) गुजरातच्या खेडा जिल्ह्यात गणेश विसर्जनादरम्यान जातीय तणाव निर्माण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. विसर्जन मिरवणूकीवेळी डीजेवर वाजत असलेल्या धार्मिक गाण्यांमुळे जामा मशिदीजवळ काही इस्लामिक कट्टरपंथींनी मिरवणूक अडवली. १५० ते २०० च्या संख्येत आलेल्या धर्मांधांच्या भावना भडकल्याने त्यांनी विसर्जन मिरवणूकीवर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. सदर घटना मंगळवारी घडली असून पोलिसांनी ११ आरोपींना अटक केली आहे.
हे वाचलंत का? : ‘गुस्ताख-ए-नबी की एक सजा… सिर तन से जुदा’, कट्टरपंथींची मंदिरासमोर घोषणाबाजी
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी निघालेल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शेकडो भाविक उपस्थित होते. यात तरुणांबरोबरच वयोवृद्ध आणि लहान मुलांचाही सहभाग होता. डिजेवर धार्मिक गाणी वाजत होती. तेव्हा जामा मशिदीजवळ मिरवणूक पोहोचताच इस्लामिक कट्टरपंथींनी त्यांचा मार्ग अडवला आणि डीजे बंद करण्यास सांगितला. भाविकांना तसे करण्यास नकार दिल्याने दोन्ही बाजूंमध्ये तणाव निर्माण झाला. तेव्हा जमलेल्या गर्दीत १५० ते २०० धर्मांधांच्या जमावाने काठ्या, लोखंडी पाईप व अन्य हत्यारे भाविकांवर हल्ला केला. या हल्ल्यात काही भाविक जखमीही झाले असून त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.
पोलिसांनी बळाचा वापर करून परिस्थिती नियंत्रणात आणली. स्थानिक आमदार कल्पेश परमार हेही घटनास्थळी गेले. त्यांनी लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. या हल्ल्यातील आरोपींवर कठोर कारवाईची मागणी हिंदू संघटनांनी केली आहे. पोलिसांनी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आतापर्यंत ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या परिस्थिती नियंत्रणात असून इतर हल्लेखोरांची ओळख पटवली जात आहे.