‘गुस्ताख-ए-नबी की एक सजा… सिर तन से जुदा’, कट्टरपंथींची मंदिरासमोर घोषणाबाजी

19 Sep 2024 13:50:44
 
 Eid
 
लखनऊ : देशात ईदच्या  (Eid) दिवशी कट्टरपंथींचा कही राज्यांमध्ये उन्माद दिसून आला होता. उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर येथे मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूर हिंदू मंदिराजवळून जात असताना काही कट्टरपंथींनी जमावाने सर तन से जुदा अशा वादंग निर्माण करणाऱ्या घोषणा दिल्या आहेत. गुस्ताख-ए-नबी की एक सजा अशा घोषणाबाजी करत मिरवणुकीत सहभागी झालेल्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
 
 
या व्हायरल झालेल्या व्हिडिओत डुमरियागंज पोलीस ठाणे दिसत आहे. ज्याठिकाणी कट्टरपंथींनी मंदिरासमोर घोषणा दिल्या होत्या. हा व्हिडिओ ऑनलाईन व्हायरल होताच सिद्धार्थनगर पोलिसांनी कारवाई करत या प्रकरणाचा तपास सुरू केला. एएसपी सिद्धार्थ म्हणाले की, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत आक्षेपार्ह घोषणाबाजी प्रकरणी चौकशी केली आहे. याप्रकरणाचा अद्यपहा सताप सुरू आहे. या तपासातून जी माहिती येईल यामध्ये नेमके काय तथ्य आहे. याचपार्श्वभूमीवर पुढील कारवाई केली जाईल असे सांगितले गेले.
 
 
Powered By Sangraha 9.0