दिल्लीत मुनव्वर फारुकीला जीवे माऱण्याची धमकी, तडकाफडकी ‘या’ ठिकाणी रवाना

18 Sep 2024 16:15:05

munnawar 
 
मुंबई : हिंदी बिग बॉसचा विजेता मुनव्वर फारुकी याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. काही दिवसांपूर्वी तो दिल्लीत गेला असता त्याला ही धमकी देण्यात आली असून तो तातडीने मुंबईला रवाना झाला आहे, दरम्यान, शनिवारी दिल्लीतल्या इनडोअर स्टेडियम आणि सूर्या हॉटेल या ठिकाणी ही घटना घडली.
 
मुनव्वर फारुकी आणि युट्यूबर एल्विश यादव हे दोघंही दिल्लीतील सूर्या हॉटेलमध्ये एक सामना खेळण्यासाठी गेले होते. त्यावेळी मुन्नवरला ही धमकी देण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी हॉटेलची रेकी केल्याचंही समजलं होतं. ज्यावेळी धमकी गिली त्याचक्षणी हा सामना थांबवण्यात आला. पोलिसांनी स्टेडियमची पूर्ण पाहणी केली आणि त्यानंतर काही वेळात सामना सुरु करण्यात आला. सामना संपल्यावर लागलीच मुनव्वर मुंबईला परतला. दिल्ली पोलिसांनी भविष्यात मुनव्वर दिल्लीत आला तर त्याच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतील असे सांगितले आहे.
 
काही दिवसांपूर्वी ईसीएल क्रिकेट लीग सुरु झाली असून मुनव्वर फारुकी, एल्विश यादव, अभिषक मल्हान, सोनी शर्मा आणि अनुराग द्विवेदी खेळत आहेत. २२ सप्टेंबरपर्यंत ही लीग चालणार आहे. दरम्यान, दिल्ली पोलीस एका गोळीबार प्रकरणाची चौकशी करत होते. त्यावेळी काही संशयितांकडून पोलीस माहिती घेत होते. त्यावेळी काही संशयितांकडून त्यांना ही माहिती मिळाली की सूर्या हॉटेलची रेकी करायला ते गेले होते. मुनव्वरवर हल्ला होणार ही माहिती याच संशयितांच्या चौकशीतून पोलिसांना मिळाल्यामुळे.पोलिसांनी तातडीने सूर्या हॉटेलकडे धाव घेतली आणि काही संशयास्पद आढळते आहे का याचा तपास केला.
 
 हे ही वाचा: दशकातील सर्वात मोठा अ‍ॅक्शनपट ‘रानटी’ झळकणार मराठी रुपेरी पडद्यावर
 
मुनव्वर फारुकी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी कोकणी लोकांबाबत क्राऊड वर्क करताना आक्षेपार्ह शब्द वापरल्याने तो चर्चेत आला होता. मात्र ते आपल्याकडून अनावधानाने झालं, मला कुणालाही दुखवायचं नव्हतं असं फारुकीने सांगितलं आणि माफी मागितली होती. कोकणी माणसावरच्या टीकेमुळे आणि नंतर मागितलेल्या माफीमुळे त्याची चर्चा झाली होती.
Powered By Sangraha 9.0