मुंबई : आयटी क्षेत्रातील अग्रणी कंपनी इन्फोसिस सरकारी विमा कंपनीकरिता नव्या पिढीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा अवलंब करणार आहे. विमा क्षेत्रातील मोठी सरकारी कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन(एलआयसी)ने पुढच्या पिढीतील डिजिटल प्लॅटफॉर्मचा अवलंब करून डिजिटल परिवर्तन घडवून आणण्यासाठी इन्फोसिसची निवड केली आहे.
दरम्यान, ग्राहक, एजंट आणि कर्मचाऱ्यांसाठी उत्तम अनुभव आणि डेटा-चालित वैयक्तिकरण करण्यावर भर देण्यासाठी सरकारी विमा कंपनी इन्फोसिसची निवड केली आहे. या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या निर्मितीसाठी करण्यात आलेल्या कराराची रक्कम कंपनीने अद्याप उघड केलेली नाही.
एका निवेदनानुसार (डिजिटल इनोव्हेशन अँड व्हॅल्यू ॲडिशन) नावाचा डिजिटल परिवर्तनाचा उपक्रम पुढे नेण्यासाठी भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीसोबत करार जाहीर केला आहे. इन्फोसिस एलआयसीसाठी नव्या पिढीचे डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करेल, ग्राहकांना चांगला अनुभव मिळेल. एलआयसीने बँकिंग, वित्तीय आणि विमा क्षेत्रातील सखोल कौशल्य आणि अनुभव लक्षात घेऊन इन्फोसिसची निवड केली आहे, असे एलआयसीने निवेदनात म्हटले आहे.