विशेष मुलांनी तयार केलेला 'पुठ्ठयांचा बाप्पा'

    14-Sep-2024
Total Views |

पुठ्ठयांचा बाप्पा  
 
मुंबई - गणेशोत्सवानिमित्त अनेक ठिकाणी आपल्या वैविध्यपूर्ण आणि सुंदर बाप्पाच्या मूर्त्या पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी शाडू मातीचा तर काही ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्त्या तयार केलेल्या आहेत. पण अंधेरीमधील मरोळ येथे चक्क पुठ्ठ्यांच्या बाप्पा' तयार करण्यात आला आहे. ईकॉम एक्सप्रेसच्या मरोळ येथील कार्यालयात १००१ पुठ्ठयांचा वापर करून ११ फुटांचा गणपती बाप्पा तयार करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा गणपती तृतीयपंथी, दिव्यांग आणि विशेष मुलांनी तयार केला आहे. कला दिग्दर्शक सुमीत पाटील यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाने हा विशेष बाप्पा साकार झाला आहे. विशेष मुलांचा गणपती बनवण्याचा उत्साह आणि निर्मळ भाव पाहून ईकॉम एक्स्प्रेसच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही सहभाग घेत ही कलाकृती बनवण्यात त्यांची मदत केली. सर्वांनी मिळून ३ तासात हा खास बाप्पा तयार केला, मनोभावे बाप्पाची आरती आणि पूजा केली तसेच ढोल ताशांच्या तालावर ताल धरत आपल्या लाडक्या बाप्पाचे स्वागत ही केले. या गणरायाचे विसर्जन न करता तो घराघरात पोहोचावा यासाठी ज्या १००१ बॉक्सेसपासून तो बनवला आहे त्या प्रत्येक बॉक्समध्ये विशेष भेटवस्तू ठेवून कंपनीच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला देण्यात येणार आहे.