लादेनचा मुलगा हमजा बिन लादेन जिवंत?, तालिबानविरोधी संघटनेचा दावा
14-Sep-2024
Total Views |
नवी दिल्ली : कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेन, याचा मुलगा हमजा बिन लादेन जिवंत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. २०१९ साली अमेरीकेने केलेल्या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाल्याची घोषणा डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. परंतु, सीआयएला या संदर्भात कुठलाही पुरावा आढळला नाही. हमजा हा केवळ जिवंतच नसून, अल् कायदाच्या कारवायांमध्ये त्याचा सक्रीय सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे.
कोण आहे हमजा बिन लादेन ?
क्राऊन प्रिंस ऑफ जिहाद म्हणून ओळखला जाणारा हमजा हा ओसामा बिन लादेनचा मुलगा आहे. लहानपणापासूनच, दहशतवादी कारवाया करण्यासाठी त्याला प्रशिक्षण देण्यात आलं होतं. अमेरीकेवरील, ९/११च्या हल्ल्यापूर्वी तो अफगाणिस्तान मध्ये त्याच्या वडिलांसोबत राहत होता, तिथे तो शस्त्रं चालवायला शिकला. याच सोबत तो अनेक प्रोपोगंडा व्हिडिओंमध्ये दिसत असे, जिथे त्याने अमेरिकन, ज्यू आणि "क्रूसेडर" यांच्यावर टिका केली होती.
पश्चिमी राष्ट्रांसाठी धोक्याची घंटा!
नॅशनल मोबिलायझेशन फ्रंट (एन्एम्एफ्) या तालिबान विरोधी संघटनेकडून, हमजाच्या संदर्भातला अहवाल प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात दिलेल्या माहितीनुसार, हमजा पंजशीर प्रांतातील दारा अब्दुल्ला खेल जिल्ह्यात लपून बसला आहे. त्याच्या रक्षाणासाठी ४५० शस्त्रधारी अरब आणि पाकीस्तानी सैनिक सज्ज आहेत. अल कायदा आणि तालीबान या दोन्ही संघटनांच्या संबंधांवर या अहवालात प्रकाश टाकण्यात आला आहे. वरिष्ठ तालिबान नेत्यांना हमजाबद्दल माहिती असून, ते त्याला आणि त्याच्या कुटुंबाला संरक्षण देत आहेत. एन्एम्एफ् ने दिलेल्या चेतावनी नुसार, हमजाच्या नेतृत्वात अल् कायदा पुन्हा एकदा संघटित होऊन, पश्चिमी राष्ट्रांवार हल्ला करण्याच्या तयारीत आहे. या गोष्टीचं गांभीर्य पश्चिमी राष्ट्रातल्या नेत्यांनी वेळीच लक्षात घेणं गरजेचं आहे.