'या' कंपनीचे दोन वर्षांनी भारतात पुनरागमन; चेन्नई प्लांटमध्ये उत्पादन पुन्हा सुरू करणार
14-Sep-2024
Total Views |
मुंबई : अमेरिकन कार कंपनी फोर्ड पुन्हा एकदा भारताता पुनरागमन करणार आहे. भारतात कार उत्पादन पुन्हा सुरू करण्यासाठी तामिळनाडू सरकारला औपचारिक पत्रव्यवहार केला असून चेन्नई प्लांटचे पुनरुज्जीवन करण्याच्या व्यवहार्यता योजनांवर चर्चा करण्यासाठी सरकारकडून पुढाकार घेण्यात आला. फोर्ड मोटर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सरकारसोबत अनेक बैठकाही घेतल्या आहेत.
दरम्यान, फोर्ड कंपनी कार उत्पादन निर्यातीची योजना असून देशांतर्गत विक्रीसाठी कोणतीही उत्पादन योजना असल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले नाही. मेड-इन-इंडिया स्वस्त इलेक्ट्रिक वाहन(ईव्ही) प्लॅटफॉर्मसह पूर्णपणे आयात करण्यासाठी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी प्लांट पुन्हा सुरू करण्याच्या चर्चेला आता पुर्णविराम मिळाला आहे.
सुमारे दोन वर्षांपूर्वी कंपनीने सप्टेंबर २०२१ मध्ये भारतातून आपला व्यवसाय बंद करण्याची घोषणा केली होती. कंपनी दक्षिण-पूर्व आशियाई बाजारपेठेत निर्यात करण्यासाठी चेन्नईतील मराईमलाई नगर कारखान्यात इलेक्ट्रिक वाहने निर्माण होण्याची शक्यता आहे. फोर्डने ऑगस्ट २०२२ मध्ये मराईमलाई नगर कारखान्यातील उत्पादन बंद केले होते त्यानंतर आता कार उत्पादन पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.