उद्धव ठाकरे! हेच का मविआचं वेगळं हिंदुत्व?, कर्नाटकातील प्रकारावरुन भाजपची टीका

    14-Sep-2024
Total Views |
 
Thackeray
 
मुंबई : कर्नाटकातील पोलीस व्हॅनमध्ये ठेवण्यात आलेल्या गणेशमुर्तीचे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत. दरम्यान, यावरून आता भाजपने महाविकास आघाडीला आणि विशेषत: उद्धव ठाकरेंना धारेवर धरलं आहे. हेच का मविआचं वेगळं हिंदुत्व? असा सवाल भाजपकडून ठाकरेंना करण्यात आला आहे.
 
हे वाचलंत का? -  जरांगेंच्या पाठीमागे कोण? छगन भुजबळांनी स्पष्टच सांगितलं
 
मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनीसुद्धा पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते म्हणाले की, "कर्नाटकात काँग्रेसने मत्सरासुर या राक्षसाचा अवतार धारण केला असून थेट गणपती बाप्पालाच या काँग्रेसी असूराने अटक केली आहे. हिंदू धर्म, रामाचा, साधूंचा आणि देव देवतांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसला जनता धडा शिकवेलच. मत्सरासुर राक्षस कितीही माजला तरी त्याचा वध नक्की होतो. महाराष्ट्रात याच काँग्रेसने श्रीमान उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात सार्वजनिक गणेशोत्सवावर बंदी आणली होती. पण खुर्चीसाठी फितूर झालेले आणि काँग्रेसच्या हिंदू विरोधी कळपात सामिल झालेल्या उबाठा सेनेला जनाची नाही तर किमान मनाची तरी लाज वाटतेय का? आता उबाठा सेना तातडीने रस्त्यावर उतरून जुतेमारो आंदोलन करणार का?" असा सवाल त्यांनी ठाकरेंना केला आहे. तसेच भाजप आमदार प्रविण दरेकर यांनीसुद्धा या घटनेवर निषेध व्यक्त केला आहे.