काँग्रेस नेत्याच्या निकटवर्तीयाकडून वंदे भारत रेल्वेवर दगडफेक
14-Sep-2024
Total Views |
विजापूर : छत्तीसगड राज्यातील विजापूर येथील वंदे भारत (Vande Bharat) येथे दगडफेक करण्यात आली होती. यामुळे ३ डब्यांच्या काचा फोडण्यात आल्याची धक्कादायक बाबा आढळून आली आहे. याप्रकरणात सुरू असणाऱ्या वंदे भारत रेल्वेवर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणात महासमुंदमध्ये वंदे भारत ट्रेनच्या ट्रायल सुरू होती. यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला होता. याप्रकरणात काँग्रेस नेत्याच्या एका निकटवर्तीयाचा समावेश आहे.
या कालावधीत पोलिसांनी ५ आरोपींना अटक केली आहे.हे सर्व आरोपी बगबहरा येथील रहिवासी आहेत, त्यांच्याविरूद्ध पोलिसांनी रेल्वे कायदा १९८९ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.
काय आहे नेमके प्रकरण?
आरपीएफ अधिकारी परवीन सिंहांनी याप्रकरणाबाबत सांगितले की, वंदे भारत ट्रेन १६ सप्टेंबर रोजी धावणार आहे. यामुळे वंदे भारत ट्रायलची तपासणी होत होती. मात्र सकाळी ७.१० वाजता ही रेल्वे महासमुंग येथून निघाली असता नऊ वाजता बागबाहराजवळ काही समाजकंटकांनी चालत्या वाहनावर दगडफेक केली. यावेळी एका पथकाने तातडीने जाऊन तपास केला आणि पाच आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये शिवकुमार बघेल, देवेंद्र कुमार, जितू पांडे सोनवणी आणि अर्जुन .यादव अशी पाच आरोपींची नावे आहेत. हे पाचही बागबहरा येथील आहेत.
याप्रकरणात आता पोलिसांनी या पाचही जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. याप्रकरणात दगडफेक करणाऱ्यांपैकी शिवकुमार बघेल हे काँग्रेसचे खिल्लारी विधानसभा अध्यक्ष असून त काँग्रेस नेता ताम्रवल ध्वजचा भाऊ असल्याची माहिती आहे.