प्रभू श्रीरामाचे मंदिर उडवून योगींना जीवे मारेन! कट्टरपंथी मोहम्मद मकसूदची धमकी
14-Sep-2024
Total Views |
भागलपुर : उत्तर प्रदेशातील अयोध्या (Ayodhya) येथील प्रभू श्रीरामाचे बांधलेले मंदिर उडवण्याची धमकी एका कट्टरपंथी युवकाने दिली आहे. एवढेच नाहीतर त्याने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. ही घटना बिहार येथील भागलपुर येथे १४ जून रोजी घडली होती. उत्तर प्रदेश पोलिसांनी याप्रकऱणात लक्ष घालत आरोपी मोहम्मद मकसूदला अटक केली आहे.
मोहम्मद मकसूद हा आपल्या बहिणीकडे आला होता. त्यावेळी मोबाईल क्रमांक ट्रेस करून त्याने भागलपुर येथील गुरहट्टा चौक ठिकाणाहून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मोहम्मद हा जैश्न-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी जोडला गेलेला आहे. पोलिसांनी तपास करत असताना त्यांच्याकडून तब्बल चार मोबाईल जप्त केले आहेत. यामध्ये त्याने श्रीरामाचे मंदिर उडवण्याबाबतची माहिती पुराव्यीनिशी हाती लागली होती.
दरम्यान, याप्रकरणात पोलिसांनी भागपुर येथे मोहम्मदला पोलिसांनी ताब्यात घेतले. युपी पोलिसांनी छापेमारी करत घडलेल्या घटनेची शहानीशा केली होती. यावेळी पोलिसांनी आरोपी मोहम्मद मकसूदला अयोध्या येथे घेऊन गेले. याप्रकरणात पुढील तपास सुरू आहे.