गणेश विसर्जनादिवशी कर्नाटकात कट्टरपंथींकडून दगडफेक प्रकरणात पोलिसांचे निलंबन

    14-Sep-2024
Total Views |

Stone Pelting Ganesh Murti
 
बंगळुरू : गणेश विसर्जनादिवशी कर्नाटकातील मंड्या येथील काही कट्टरपंथींनी गणेशमूर्तीवर दगडफेक केली. याप्रकरणात पोलिसांनी १० एफआरआय नोंदवले होते. मात्र पोलिसांना निलंबित करण्यात आल्याचेस सांगितले गेले. आतापर्यंत ५६ जणांना अटक करण्यात आली असून ९० जणांचा शोध सुरू आहे. याबरोबर शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती.
 
देशात गेल्या काही दिवसांपासून अनेक ठिकाणी गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन केल्याप्रकरणी १३ सप्टेंबर रोजी पोलिसांना निंलंबित करण्यात आले होते. गेल्या वर्षी गणेश चतुर्थींच्या वेळी गणेशाच्या मूर्तीवर अनेकदा दगडफेक झाली होती. पोलीस निरिक्षक आशिक शेलार हे आपल्या वरिष्ठांना माहिती देण्यात अयशस्वी ठरले होते. यावेळी अशोक कुमार हे तणावाची परिस्थिती हाताळताना अपयशी ठरल्याने त्यांचे निलंबन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
 
यावेळी मंड्याचे एसपी मल्लिकार्जुन बलदंडींनी सांगितले की, मंड्यातील बदरीकोप्पलू गावातील मशिदीठिकाणी गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती. याच मशीदीठिकाणी पोलिसांचा फौजफाटा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सूत्रांनी, हिंसाचार आणि दंगलीप्रकरणी १५० जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता कलम १६, १०९, ११५, ११८,११८, १२१, १३२, १८९, १९० अंतर्गत एफआरआय दाखल करण्यात आला आहे.
 
याप्रकरणी आरोपीची ओळख पटवण्यासाठी पोलीस घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज घेत आहेत. शुक्रवारी पोलिसांनी चार आरोपींना अटक केले. तसेच यापूर्वी अटक करण्यात आलेल्य़ा ५२ आरोपींना गुरूवारी म्हणजेच १२ सप्टेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. मंड्या जिल्ह्यात न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
 
यावेळी फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी जाऊन घडलेल्या घटनेची माहिती मिळवली आहे. घटनास्थळी अद्यापही तणावाचे वातावरण असून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याबरोबर शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. यावेळी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. याप्रकरणात तब्बल २५ दुकानांची जाळपोळ करण्यात आली होती.