कागदापासून तयार झालेला २१ फुट उंच 'अंधेरीईश्वर'

    14-Sep-2024
Total Views |

अंधेरीईश्वर  
मुंबई : अंधेरीईश्वर तरुण मित्र मंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे या वर्षीसुद्धा पर्यावरणपुरकतेला प्राधान्य देऊन ‘कागदी बाप्पाच्या मूर्तीची’ निवड केली गेली आहे. अश्वरूढ असलेली ही २१ फुटांची मूर्ती संपूर्णपणे कागदी टिश्यूंपासून तयार केलेली आहे. मूर्तिकार राजेश मयेकर यांनी ही मूर्ती तयार केलेली आहे. भगवान विष्णुंच्या कल्की अवतारातील ही मूर्ती आहे. यंदाचे अंधेरीईश्वर मंडळाचे १९ वे वर्ष आहे. २०१३ पासून मंडळाने कागदी गणपती मूर्तीची परंपरा सुरू केली आणि दरवर्षी ती जपत आहे.  

“२१ फूट उंच अश्वारूढ असलेली ही मूर्ती टोकापासून अश्वापर्यंत पूर्णपणे कागदी टिश्यूंपासूनच तयार केलेली आहे. गणेश जयंतीला आम्ही मूर्ती कशी हवी आहे ह्याचे स्केच बनवायला देतो. त्यानंतर स्केच तयार झाले की मूर्तिकार आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक होते व काही बदल असतील तर केले जातात. मार्च अखेरीस मूर्ती तयार करायला घेतली जाते. दोन ते तीन महिन्यांमध्ये मूर्ती बनून तयार होते.” अशी माहिती मंडळाचे सल्लागार निलेश भोजने यांनी दिली.