अखिल भारतीय मराठा महासंघ आणि दसपटी विद्यमानाने आयोजित “मराठा शक्ती आणि संस्कृती जागृती मेळावा” २०२४ चे चिपळूण मध्ये यशस्वी आयोजन
नरेंद्रजी पाटील प्रमुख पाहुणे तर महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी कोंढरे अध्यक्षस्थानी
14-Sep-2024
Total Views |
रत्नागिरी : रविवार, दि. १ सप्टेंबर २०२४ रोजी, इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र, चिपळूण येथे अखिल भारतीय मराठा महासंघ व दसपटी वतीने घेण्यात आलेला मराठा शक्ती आणि स़ंस्कृती जागृती मेळावा २०२४, दिमाखात पार पडला. या मेळाव्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महाविकास मंडळाचे अध्यक्ष नरेंद्रजी पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्रजी कोढरे यांनी भूषविले. त्याचप्रमाणे दसपटी विभागातून रामवरदायिनी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष व उद्योजक प्रतापराव शिंदे, उद्योजक अविनाशराव शिंदे, दिपकराव शिंदे, शामकांत कदम इ. मान्यवर उपस्थित ह़ोते. तर खेड तालुक्यातून आ. संजयजी कदम, उद्योजक श्रीकृष्ण वाबळे, महासंघाचे सरचिटणीस प्रकाशजी देशमुख, कोकण विभाग प्रमुख प्रविणजी पवार अश्या मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शविली. त्याचप्रमाणे फार्मर प्रोड्युसर आँर्गेनायजेशन व सहकारचे जाणकार राजकपूर सिंग यांनी उपस्थितांना संबोधित करताना सहकार हे विकासाचे स्त्रोत असून ते राबविल्याने कोकणचा विकास शक्य असल्याचे सांगून, त्याच्या नियोजनाची देखील हमी त्यांनी घेतली. संजय यादवराव व राजन घाग यांनी देखील मेळाव्याला संबोधित करताना कोकणची भूमी ही देणारी असून समाजाने एकत्र येणे ही काळाची गरज असून, समाजाने समाजकंटकांच्या बोलण्याला बळी न पडता एकत्र यावे, असे आव्हान देखील केले.
अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्रजी पाटील, यांनी कोकणातील उद्योगांना उभं करण्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून सर्व ती मदत केली जाऊन, चिपळुणात देखील अण्णासाहेब पाटील महामंडळाचे एक कार्यालय उघडण्यासाठी महासंघाच्या जिल्हा कार्यकारिणीला सूचना केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेले राजेंद्रजी कोढरे यांनी देखील उपस्थितांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करीत, कोकणातील लोकांनी उद्योगाच्या उदासिनतेचा त्याग करून, उद्योगात समर्थपणे उतरण्याचे आव्हान केले. महासंघाचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण बामणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडले तर महासंघाचे रत्नागिरी उपाध्यक्ष व डिजीयुगंधराचे मुख्यसंपादक संतोषराव शिंदे यांनी आलेल्या मान्यवरांचे दसपटी वतीने स्वागत करत, उपस्थित मान्यवरांना दसपटीच्या ध्वजमुद्रेने सन्मानित करीत त्यांचे आभार मानले आणि दसपटी म्हणजे केवळ तेरा गांव शिंदे - कदम असे नसून, प्रस्थापित राजकारण्यानी केलेलं हे षडयंत्र असल्याचे सूचवित, कुंभार्ली ते दाभोळ हा संपूर्ण ऐतिहासिक सुभा दसपटी असल्याचे सांगितले. शिवकाळाअगोदर पासून हा सुभा उद्योगाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठ असल्याचे सांगत तो दसपटकर शिंद्यांच्या अखत्यारीत होता. पुढे तो स्वराज्यात विलीन होऊन हिंदवी स्वराज्याचे आरमार सर्वप्रथम याच सुभ्यात असलेल्या दाभोळ मध्ये छत्रपतीनी उभे केले. अश्या या ऐतिहासिक भूमीत हा उद्योग मेळावा होणे हे दसपटकरांचे भाग्य असल्याचे देखील या मेळाव्याचे मुख्य संयोजक संतोषराव शिंदेनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले. त्यामुळे त्याचे उद्धार आणि विकासासाठी आम्ही दसपटकर कटिबद्ध असून, त्याच्या विकासासाठी शासनाने सहकार्य करण्याची विनंती कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नरेंद्रजी पाटील व अध्यक्षस्थानी असलेल्या राजेंद्रजी कोंढरे यांना व कार्यक्रमात उपस्थित इतर मान्यवरांना केली. या मेळाव्यासाठी बँकांचे प्रतिनिधींनीदेखील उपस्थित राहून विशेष मार्गदर्शन केले व कोकणातील उद्योजकांना आर्थिक साहाय्य मिळण्यासाठी सर्व साहाय्य बँकांकडून केले जाण्याचे सांगितले. या मेळाव्यासाठी मराठा महासंघाच्या संजयजी कदम, संगमेश्वर तालुका अध्यक्ष, विनोदजी ग़ोगावले खेड तालुका अध्यक्ष, मंगेशजी शिंदे, संतोषजी सावंत, शामराव मोहीते, प्रकाशजी साळवी तर दसपटी विभागातून सुरेशराव शिंदे, पांडुरंगराव शिंदे, सुशिलराव शिंदे, अभिजीत शिंदे, प्रकाशराव कदम, चंद्रकांत शिंदे, गणेशराव शिंदे आणि गिरीशजी चापडे यांनी मराठा मेळावा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. या सर्व मंडळींचे महासंघ व दसपटी वतीने आभार.
त्याचप्रमाणे चिपळूण, संगमेश्वर तालुक्यात अँग्रो टुरिझम, अँग्रीकल्चरल, व छोटे मोठे उद्योजक तयार करण्यासाठी दसपटी वतीने विशेष समिती बनवून विभागात गावोगावी जाऊन उद्योगासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगत, लवकरच दसपटीत अवैध जमिन विक्रीवर रोख आणून, ओसाड जमिनी लागवडी खाली आणण्यासाठी अँग्रो टुरिझम, आँरगेनिक अग्रीकल्चर इ. उपक्रम राबवून नवीन उद्योग व भूमिपुत्रांना नोक-या उपलब्ध करून देणार असल्याचे आपल्या संवादादरम्यान, पत्रकारांना देण्यात आलेल्या मुलाखतीत कार्यक्रमाचे मुख्य संयोजक संतोषराव शिंदे यांनी सांगितले. त्याचप्रमाणे प्रस्थापित नेते मंडळींनी भूमिपुत्र तसेच चिपळुणातील जनतेची दिशाभूल करणे थांबवावे, अन्यथा त्यांचे असली मुखवटे मिडियाच्या माध्यमातून जनतेच्या समोर आणू, अशी देखील चेतावणी त्यांनी कार्यक्रमानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.