रुमांलांपासून तयार केलेला बाप्पाचा मखर

    13-Sep-2024
Total Views |

 
ramal dekhava
 
मुंबई : लोअर परळ मधील रहिवासी राजू राणे यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्यांच्या राहत्या घरी घरगुती आणि पर्यावरणपूरक वस्तूंनी तयार केलेला देखावा साकारला आहे. या वर्षी त्यांनी रुमालांच्या सहाय्याने सुंदर देखावा तयार केला आहे. हा देखावा तयार करण्यासाठी त्यांना फक्त दोन दिवस लागले. राजू राणे हे २०१२ पासून पर्यावरणपूरकतेला प्राधान्य देण्यासाठी घरातील पर्यावरणपूरक वस्तुंचा वापर करून देखावा तयार करतात. या पूर्वी त्यांनी टोपल्या, पत्रावल्या, द्रोण, गुळाची ढेप, किराणा वस्तु आणि मुलांचे शालेय साहित्य आदी वस्तुंचा कल्पनात्मक आणि कलात्मक वापर करून देखावे तयार केलेले आहेत. कमीत कमी खर्चात आणि उपलब्ध वस्तुंपासून अधिकाधिक सुंदर देखावे तयार करता येऊ शकतात हे त्यांच्या या देखाव्यांमधून पाहायला मिळते. हे देखावे तयार करण्यासाठी वापरल्या गेलेल्या वस्तू ते दरवर्षी वसईतील गाडगेबाबा अनाथ आश्रमातील गरजू मुलांना दान करतात. हा पर्यावरणाचे जतन करण्याचा आणि अनाथांना मदत करण्याचा वसा त्यांनी गेली अनेक वर्षे जपला आहे.