साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची निवड राज ठाकरे करणार

    12-Sep-2024
Total Views |
 
sahitya sanmelan
 
दिल्ली : राजधानी दिल्ली मध्ये होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाची निवड मनसे अध्यक्ष राजे ठाकरे करणार आहेत. दिल्लीतील सरहद या संस्थेला यावर्षीच्या या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान मिळाला आहे. या ९८ व्या साहित्य संमेलनासाठी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सरहद संस्थेच्या वतीने बोधचिन्ह स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत देशभरातून शंभरहून अधिक कलाकारांनी सहभाग घेतला. त्यातून संमेलनासाठी वापरण्यात येणाऱ्या बोधचिन्हाची निवड राज ठाकरे करणार असून त्यांच्याच हस्ते बोधचिन्हाचे अनावरण करण्यात येणार आहे.
 
यापूर्वी १९५४ मध्ये दिल्ली येथे मराठी साहित्य संमेलन झाले होते. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. तब्बल ७० वर्षांनंतर पुन्हा एकदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली मध्ये भरणार आहे.