मुंबई : वोट जिहादसाठी गणरायाचा आणि हिंदुत्वाचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सरन्यायाधिश धनंजय चंद्रचूड यांच्या घरच्या गणपतीचे दर्शन घेतले. यावरून संजय राऊतांनी टीका केली होती. यावर आता सोमय्यांनी प्रत्युत्तर दिले.
हे वाचलंत का? - मविआचं १२५ जागांवर एकमत : विजय वडेट्टीवार
किरीट सोमय्या म्हणाले की, "पुन्हा एकदा संजय राऊत यांनी गणरायाचा आणि हिंदूत्वाचा अपमान केला आहे. नरेंद्र मोदीजी मुख्य न्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घरी गणेश दर्शनाला जातात. अमित शहा दर्शन लालबागच्या राजाचे करतात आणि संजय राउत उर्फ उद्धव ठाकरे हे त्याचा निषेध करतात. वोट जिहादसाठी आणि मुस्लीम मतांसाठी अशा प्रकारे गणरायाचा आणि हिंदुत्वाचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही," असे ते म्हणाले.