‘येशूच्या नावाने’ हे काय?

12 Sep 2024 20:45:51
Bishop appeals to Quiboloy


ख्रिस्ती धर्मगुरू अपोलो क्विबोलोय याने फिलीपिन्सच्या दावाओ शहरामध्ये गेली 39 वर्षे साम्राज्य उभे केले. त्या साम्राज्याचे नाव काय, तर ‘चर्च-किंगडम ऑफ जीसस क्राईस्ट.’ नुकतेच ख्रिस्ती धर्मगुरू अपोलो क्विबोलोय यांना मानवी तस्करी, बलात्कार, फसवणूक, हवाला वगैरे गुन्ह्यांसाठी अटक झाली आहे.

ख्रिस्ती धर्मगुरू अपोलो क्विबोलोय याने 75 एकर जमिनीवर जे चर्च उभे केले होते, त्याला चर्च म्हणून जरी संबोधले, तरी ते एक छोटेसे गावच होते, नव्हे एक साम्राज्यच. तिथे 40 इमारती, एक शाळा, एक महाविद्यालय आणि 75 हजार लोक एकत्र बसतील असे मोठे सभागृह, एक खासगी जेट आणि गॅरेज. फिलीपिन्सच नव्हे, तर जगभरातल्या शेकडो देशांमध्ये त्याने चर्चच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थेची कार्यालये थाटली. या कार्यालयात काम करण्यासाठी फिलीपिन्समधील त्याच्या श्रद्धावान महिला पाठवल्या. त्यांचे काम काय, तर येशूच्या मर्जीनुसार त्या त्या देशात निधी गोळा करायचा, दान मागायचे. हे दान मागाताना लोकांना सांगायचे की, ख्रिस्ती धर्मगुरू अपोलो क्विबोलोय हे या युगातले परमेश्वराचे पुत्र आहेत.

अपोलो गरिबांची, रुग्णांची सेवा करतात. सेवा करण्यासाठी निधी गोळा करतात, तर निष्पाप बालकांच्या आणि रुग्णांच्या नावाने या महिलांनी जगभरातून निधी गोळा करायचा. तसेच गरीब भोळ्या लोकांना अपोलो दुःखातून, गरिबीतून दूर करू शकतात, हे पटवून द्यायचे. अपोलोच्या फिलीपिन्समध्ये असलेल्या चर्चमध्ये आल्यास सगळे त्रास संपतील, अशीही खात्री पटवून द्यायची. निष्पाप गरीब बालकांच्या संगोपनासाठी किंवा रुग्णांच्या उपचार सेवेसाठी म्हणून दान केलेल्या या पैशाचे पुढे काय व्हायचे?

हा सगळा पैसा गोळा करून त्या अपोलो क्विबोलोयकडे सुपुर्द करायचा. अपोलो त्यातली एक दमडीही कोणाच्या सेवेसाठी वापरायचा नाही. उलट त्या सगळ्या पैशाचा उपयोग तो चैनीसाठी आणि अय्याशीसाठी करे. निधी उपलब्ध करून देणार्‍या महिलांना तरी तो काही वेतन द्यायचा का? तर तसेही नाही. या महिला कधी काळी त्याच्याकडे धर्माच्या श्रद्धेखातर, विश्वासाने आलेल्या होत्या. तेव्हा त्यांच्याकडून धोक्याने, जबरदस्तीने अपोलोने करार लिहून घेतला होता. तो असा- ‘या मुली, महिला स्वखुशीने ख्रिस्ती धर्मगुरू अपोलो क्विबोलोयच्या म्हणण्यानुसारच जगतील आणि वागतील. तो म्हणेल ती कामे करतील.’ हा करार केल्यामुळे मुली, महिला भीतीमुळे अपोलो जे सांगेल ते करायच्या. दुसरीकडे अपोलोने या श्रद्धावान नव्हे, अंधश्रद्धेने ग्रस्त असलेल्या मुली, महिलांना भ्रमित केले होते की, ‘तो देवाचा पुत्र आहे. नव्हे, देवानेच त्याला पुत्र म्हणून निवडले आहे.

तोच सध्या ब्रम्हांडाचा नायक आहे. त्यामुळे देवाची करूणा, दया आणि आशीर्वाद हवा असेल, तर अपोलोचे म्हणणे एकलेच पाहिजे.’ त्यामुळे या महिलांकडे अपोलोच्या कोणत्याच म्हणण्याला नकार देण्याची हिंमत नव्हती. या महिलाच काय, देशातील हजारो लोकांना अपोलोच्या म्हणण्यावर विश्वास होता. त्यामुळे अपोलोने धर्मसेवा करण्यासाठी रात्री बालिकांची भरती केली, तेव्हा कुणीही शंका उपस्थित केली नाही. आश्चर्य वाटेल की, शेकडो पालकांनी आपल्या 12 वर्सांखालील मुली त्याच्याकडे पाठवल्या. अपोलोने या बालिकांवर अत्याचार केला. ज्या बालिका, मुली, महिला नकार देत, त्यांना तो धमकावत असे की, ‘त्याला नकार म्हणजे देवाला नकार. कोणी नकार दिला, विरोध केला किंवा कुठे वाच्यता केली, तर तो त्या बालिकेला किंवा मुली महिलेला थेट नरकातच पाठवेल. मग भोगा नरकवास.’ बिचार्‍या बालिका. दुःख आणि संताप वाटतो.

खरे तर, 2021 सालीच अमेरिकेने त्याला गुन्हेगार घोषित केले होते. मात्र, फिलीपिन्सच्या राष्ट्रपतींचा धार्मिक सल्लागार म्हणून तो कार्यरत असल्याने त्याला अटक झाली नव्हती. आता अपोलो क्विबोलोयला अटक झाली आहे. त्यासाठीही पोलिसांना खूप लढा द्यावा लागला. असो. या पार्श्वभूमीवर एक मुुद्दा आहे की, आपल्या देशामध्ये पंजाबसारख्या राज्यात आशिया खंडातले दुसरे मोठे चर्च उभे राहात आहे. शीख धर्माचा पवित्र वारसा असणार्‍या पंजाबात ख्रिस्ती धर्मीय किती असतील? पण तिथे चर्च उभे राहात आहे. तिथे ‘मेनू दर्शन होया यशूदा’ म्हणणारे किंवा ‘आपल्याकडे आकाशाच्या बापा, हालेलुया यिशू’ म्हणत गरीब वस्तीत धर्मांतरण करणार्‍या अपोलो क्विबोलोयबद्दल काही बोलतील का? येशूच्या नावाने हे काय?

9594969638
Powered By Sangraha 9.0