वसई-विरार महानगरपालिकेला एका महिन्यात मिळाल्या ४० इलेक्ट्रिक बस!

11 Sep 2024 11:57:42
 
Electric bus
 
मुंबई : ऑलेक्ट्राने ४० बसेसचा संपूर्ण ताफा वसई विरार महानगरपालिकेच्या वाहतुक विभागाकडे सुपुर्द केला आहे. महापालिकेसोबत ऑलेक्ट्राने ४० इलेक्ट्रिक बसेसच्या पुरवठ्यासाठी २४ जानेवारी २०२४ रोजी करार केला होता. २३ ऑगस्ट ला व्हीव्हीसीएमसीद्वारे प्रोटोटाइप बसला अंतिम मंजुरी देण्यात आली. त्यांनतर ऑलेक्ट्राने एका महिन्याच्या ऑलेक्ट्राने बसेसचे वितरण पूर्ण केले आहे.
 
अॅडव्हान्स ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम (ADAS), एअर सस्पेंशन, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC) डिस्क ब्रेक्स आणि उत्कृष्ट मॅन्युव्हरेबिलिटी यांसारखी वैशिष्ट्ये या बसेसमध्ये आहेत. फक्त ९० मिनिटांच्या फास्ट चार्जिंग सिस्टीममुळे ही बस २०० किलोमीटर अंतर कापू शकते. ३१ अधिक चालक आसन क्षमता असलेल्या या बसेस शहरी वाहतुकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केल्या गेल्या आहेत.
 
ऑलेक्ट्रा ग्रीनटेक लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक के.व्ही. प्रदीप यांनी सांगिल्यानुसार, प्रदूषणाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. या बस आल्याने वसई विरार शहराचा विचार केल्यास ९३ लाख लिटर डिझेलची बचत होईल. या बसेस २५ हजार टन कार्बन उत्सर्जन कमी करतील. ऑलेक्ट्राने बेस्ट आणि एसटी महामंडळाच्या बसेसच्या वितरणाचा वेगही वाढवला आहे. आतापर्यंत ऑलेक्ट्राने अनुक्रमे २५२ आणि १३८ बसेस वितरित केल्या आहेत.
 
 
 
Powered By Sangraha 9.0