सोलापूर : एका रेल्वेरूळावरील स्थानकावर मोठा दगड ठेवल्याची घटना आहे. हा एका घातपात होता की कट होता असा सवाल उपस्थित होत आहे. लोकोपायलेटमुळे ही घटना उघडकीस आली होती. लोको पायलेटच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला आहे. ही घटना रात्री सव्वा आठच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथील रेल्वे रूळावर बुधवारी घडली होती. याप्रकरणाचा पुढील तपास सुरू असून सेक्शन इंजिनिअर कुंदनकुमार यांनी कुर्डूवाडी येथे अज्ञात आरोपिंविरोधात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ४ सप्टेंबर रोजी ही घटना घडली आहे. यावेळी अज्ञातांनी कुर्डूवाडी रेल्वेस्थानकाच्या रेल्वेरूळावर मोठा सिमेंटचा दगड ठेवला होता. रेल्वेच्या ओव्हरहेड वायरची देखबाल करण्यासाठी टॉवर वॅगन सोलापूरहून लोकेज पायलेट रियाज शेख आणि उमेश ब्रदर्स हे कुर्डूवाडीकडे येत होते. त्यावेळी लोकोपायलेटला २०० मीटर अंतरावरून दगड दिसला होता. त्यावेळी घटनास्थळावर सुरक्षा रक्षक आले आणि त्यांनी अडथळा निर्माण करणाऱ्या दगडाला तिथून बाजूला काढले. यानंतर रेल्वेचा पुढील मार्ग मोकळा झाला.