पप्पू की पापी?

11 Sep 2024 23:00:31

Rahul Gandhi
 
अमेरिकेच्या एका अहवालात म्हटले आहे की, २०२२ साली इल्हान पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेली. त्याचे पूर्ण फण्डिंग पाकिस्तानने केले होते. त्यानंतर इल्हानने सातत्याने भारताचे तुकडे पडावे, यासाठी समर्थन केले. राहुल यांचे मोदींसोबत सत्तेसंदर्भात वैयक्तिक हेवेदावे असतील, पण त्यासाठी थेट देशविघातक शक्तींशी हातमिळवणी करावी? लोक बुद्धीची मर्यादा पाहून त्यांना ‘पप्पू’ म्हणतात. पण, असली काही कृत्ये पाहिली की वाटते, हा पप्पू की पापी?
 
खलीस्तानी, काश्मीरच्या दहशतवाद्यांना समर्थन करणार्‍या आणि भारताचे तुकडे पडावे, यासाठी काम करणार्‍या इल्हान उमर या अमेरिकेच्या महिला खासदाराला राहुल गांधी अमेरिकेत भेटले. ‘नवरा मेला तरी चालेल, पण सवत विधवा झाली पाहिजे’ एक अशी म्हण आहे. दुसरी म्हण आहे, ‘नाक कापून दुसर्‍याला अपशकून करणे.’ तर सध्या राहुल गांधी नावाच्या सत्तापिपासु व्यक्तीची परदेशात अशीच कारस्थाने सुरू आहेत. राहुल गांधी संसदेत महिलांना ‘फ्लाईंग किस’ देतात. राहुल गांधी हिंदूंच्या भगव्या रंगाच्या आस्थेला ‘भगवा आतंकवाद’ म्हणतात किंवा राहुल गांधी ‘मंंदिरात हिंदू लोक मुलींना छेडायला जातात,’ असे म्हणून सातत्याने हिंदूंचा अपमान करत आले आहेत. ज्या ज्या गोष्टींनी देश मजबूत हेाईल, त्या त्या गोष्टींना राहुल गांधी यांचा विरोध. मग तो ‘सीएए’ कायदा असू दे, की ‘समान नागरी कायदा’ असू दे, की ‘३७० कलम’ हटवण्याची ऐतिहासिक घटना असू दे, राहुल गांधींनी सगळ्यांना विरोध केला. उरल्या-सुरल्या मतदारांनाही चिथावले. देशातल्या तरुणांनी सशस्त्र आंदोलन करावे, यासाठीही वाटेल ते बोलत राहिले. जिथे कुठे हिंदूंमधील दोन जातींमध्ये काही वितुष्ट किंवा काही अप्रिय घटना घडली, तिथे तिथे ते आगीत तेल ओतण्यासाठीही गेले. तर ही राहुल यांची कारकीर्द आणि ही त्यांची देशसेवा! देशातील जनतेने त्यांच्या या सगळ्या बेताल वर्तनाला गांभीर्याने घेतले नाही. कारण, कालपर्यंत ते देशातल्या देशात हे सगळे उपद्व्याप करत होते. मात्र, आज ते परेदशात अमेरिकेत जाऊन भारताविरोधी विषारी फुत्कार काढत आहेत आणि भारताविरोधी लोकांनाही भेटत आहेत. ते अमेरिकेमध्ये इल्हान उमर या अमेरिकेच्या खासदार महिलेस भेटले. इल्हान अमेरिकेतील पहिली आफ्रिकी शरणार्थी मुस्लीम महिला खासदार. इल्हान ही खलिस्तानवाद्यांचे, काश्मीरच्या फुटीरतावाद्यांचेही समर्थन करते. अमेरिकेच्या एका अहवालात म्हटले आहे की, २०२२ साली इल्हान पाकव्याप्त काश्मीरमध्ये गेली. त्याचे पूर्ण फण्डिंग पाकिस्तानने केले होते. त्यानंतर इल्हानने सातत्याने भारताचे तुकडे पडावे, यासाठी समर्थन केले. राहुल यांचे मोदींसोबत सत्तेसंदर्भात वैयक्तिक हेवेदावे असतील, पण त्यासाठी थेट देशविघातक शक्तींशी हातमिळवणी करावी? लोक बुद्धीची मर्यादा पाहून त्यांना ‘पप्पू’ म्हणतात. पण, असली काही कृत्ये पाहिली की वाटते, हा पप्पू की पापी?
 
काँग्रेसवासी विनेश 
  
 
नेश फोगट यांनी काय काय केले नाही? तर शोषणाचे आरोप केले, आंदोलने केली, मोर्चे केले, रडारड केली, सरकारने सन्मानाने दिलेली पारितोषिके परत केली, एक ना अनेक. असे करून साध्य काय केले? तर, काँग्रेसच्या आमदारकीचे तिकीट. (असे मी नाही, लोक म्हणतात) तर विनेश फोगट या कुस्तीपटूची ही जीवनकथा. गेल्या काही वर्षांपासून विनेश यांचे नाव गाजत होते. ते नाव काही कुस्तीसाठी किंवा कर्तृत्वासाठी गाजत नव्हते, तर नाव गाजत होते, ते कुस्ती महासंघाविरोधातल्या आंदोलनामुळे.
 
विनेशसह काही ठराविक लोकांनी आंदोलने केली. मात्र, विनेश आणि काही सोबती सत्ताधारी भाजपविरोधातच आंदोलने करत आहेत, असे चित्र दिसू लागले, तेव्हाच जाणकारांना यातला राजकीय खेळ कळून चुकला. केंद्र सरकारच्या विरोधात विनेश, बजरंग आणि त्यांच्या साथीदारांचा वापर कोणीतरी करत आहे. तसेच वापर करणार्‍या लोकांनी आंदोलनातील प्रमुख चेहर्‍यांना काहीतरी ‘अर्थ’पूर्ण मदत दिलीच असणार, अशाही चर्चा होत्या. त्यानंतर विनेश यांना ज्या 50 किलो वजनी गटाच्या स्पर्धेतखेळायचे होते, तिथल्या गुणवान स्पर्धकाची संधी हिरावून विनेश यांचे नाव पुढे करण्यात आले. त्या गुणवंत खेळाडूचे नुकसान झाले, ते शब्दातीत आहे. पण, इतकी संधी मिळाल्यानंतरही विनेश यांच्या निष्काळजीपणामुळे त्यांना पुढे ऑलिम्पिक स्पर्धेतून रिकाम्या हाताने परतावे लागले. त्यांचेच नाही, तर देशाचेही नुकसान झाले. त्यावेळी नरेंद्र मोदींसह सगळेच विनेश यांच्या समर्थनार्थ उतरले. ऑलिम्पिक खेळातल्या जगभरातील अभ्यासकांनी विनेश यांच्या अपयशाचे कारण केवळ आणि केवळ विनेश ऑलिम्पिकचे नियम पाळू शकल्या नाहीत, हेच सांगितले. विनेश यांनीही त्यावेळी ते मान्य केले. मात्र, आता काँग्रेसची उमेदवारी मिळाल्याबरोबर, त्या पुन्हा राग आलापत आहेत की, त्यांना ऑलिम्पिकमध्ये सरकारने मदत केली नाही. आता काय बोलावे? विनेश यांचे वजन वाढले. ते कमी करण्याचे विनेश यांच्याच हातात होते. त्यासाठी मोदी किंवा भाजप सरकार किंवा भारतीय जनता काय करू शकत होती? पण, काहीही झाले तरी, भाजप आणि मोदींवरच आरोप करायचे, असेे काँग्रेसचे शास्त्र आणि शस्त्रही आहे ना! काँग्रेसवासी विनेशही ते शास्त्र आणि शस्त्र वापरणारच!
Powered By Sangraha 9.0