कोलकाता : प. बंगालमध्ये आर जी कर प्रकरणाने देशात आक्रोश निर्माण झाला आहे. त्यापाठोपाठ पं.बंगालमध्ये बलात्काराच्या घटना घडत आहेत. आरोपींना पाठिशी घालण्याचे काम तृणमूल काँग्रेस करत असल्याचे बोलले जात आहे. बंगालमध्ये झालेल्या लैंगिक शोषणानंतर एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. हे प्रकरण ताजे असताना एका ७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. संबंधित आरोपीला तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने पाठिशी घालत पीडितेच्या कुटुंबीयांना हे प्रकरण मिटवण्यास सांगितल्याचा धक्कादायक प्रकार मध्यमग्राम येथे घडला.
या घटनेने मध्यमग्राम येथे संतापाची लाट पसरली आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी पीडितेच्या कुटुंबीयांना प्रकरण शांत करण्याची ऑफर दिल्याने प्रकरण आणखी तापले. पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, पीडित मुलगी दुकानावरून परतत असताना आरोपीने पीडितेवर अमानुष अत्याचार केले आहेत. याप्रकरणी आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी पीडितेच्या कुटुंबीयांनी केली आहे.
यावेळी संतापलेल्या नागरिकांनी आरोपीच्या घराला घेराव घालत दगडफेक केली, निदर्शने दर्शवली होती. ज्या तृणमूल काँग्रेसच्या नेत्याने याप्रकरणात मध्यस्थी करून प्रकरण मिटवण्याविषयी वक्तव्य केले तो व्यक्ती पंचायत सदस्य पदावर असलेल्या व्यक्तीचा पती आहे. तेव्हा त्याच्या घरावरही दगडफेक करण्यात आली असून त्यानंतर रॅपिट अॅक्शन फोर्स गुन्हा दाखल केला आहे. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुरांच्या नळकांड्यांचाही वापर केला. याचा पुढील तपास सुरू असून पोलीस प्रशासन याप्रकरणात अलर्ट मोडवर आहे.