हिंदू मुलीशी निकाह करण्यासाठी बुरखा घालण्यास पाडले भाग, भांगेतील सिंदूर पाहताच कट्टरपंथी युवकाचा प्रकार उघड झाला

01 Sep 2024 22:21:43
 
 Child Marriage
 
लखनऊ : उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यात हिंदू अल्पवयीन मुलीशी निकाह करण्यासाठी कट्टरपंथी युवकाने फसवणूक केल्याची घटना घडली. हिंदू मुलीला मोहम्मद मुस्लिम नावाच्या कट्टरपंथी युवकाने निकाह करण्यासाठी न्यायालयात आणले होते. मात्र यावेळी अल्पवयीन मुलीच्या भांगेत कुंकू दिसल्याने मुलगी ही हिंदू असल्याचे उघड झाले. याप्रकरणी वकिलांना यासंबंधीत माहिती मिळाली असून ही घटना जौनपूर जिल्ह्यातील कुटाहान पोलीस ठाणे परिसरात ३१ ऑगस्ट रोजी घडली आहे.
 
यावेळी पीडितेच्या वडिलांनी कट्टरपंथी आरोपीवर १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला २९ ऑगस्ट रोजी फसवून नेल्याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी मोहम्मद मुस्लिमला पोलिसांनी न्याय संहिता कलम १३७ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
 
जौनपूर जिल्ह्यातील दिवाणी न्यायालयात अल्पवयीन मुलगी आणि मोहम्मद मुस्लिमने कायदेशीर कागदपत्र तयार करून संबंधित कागदपत्रांवर निकाह करण्यासाठी सह्या केल्या. मात्र त्यावेळी पीडितेने बुरखा घातला असून तिच्या भांगेत सिंदूर लावल्याचे वकिलांना दिसले. अशावेळी वकिलांना मुलगी अल्पवयीन असल्याचा संशय आला. तेव्हा वकिलांनी याप्रकरणाची चौकशी केली. हे प्रकरण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी घडलेल्या घटनेचा तपास करायला सुरूवात केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
याप्रकरणी पोलिसांनी आरोपी मोहम्मद मुस्लिमला अटक केली. तसेच पोक्से अंतर्गत कलम ८७ आणि ६४ अंतर्गत गुन्हा दाखल केला.
 
Powered By Sangraha 9.0