कोलकाता : आर जी कर प्रकरणामुळे देशातील वातावरण तापले आहे. अशातच आता हावडा येथील एका रूग्णालयात एका १३ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यावर तिच्यावर अमानुष अत्याचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. मुलीवर लैंगिक अत्याचार करणारा दुसरा तिसरा कोणीही नसून सीटी स्कॅन विभागात नुकताच कर्मचारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याने हे कृत्य केले. ही घटना २८ ऑगस्ट रोजी संबंधित रूग्णालयात घडली. त्याच दिवशी हा संबंधित प्रकार उघडकीस आला होता.
पीडित मुलीला न्यूमोनिया झाला या गैरसमजातून रूग्णालयात सीटी स्कँनसाठी नेण्यात आले. यानंतर काही वेळातच ती मुलगी रडत बाहेर येताना दिसली. रडत रडत पीडितेने दुसऱ्या रूग्णाच्या कुटुंबियांकडे मदत मागितली. मुलीची आई हॉस्पिटलच्या बाहेर होती. हे सर्व पाहून ती धावत आत आली आणि पीडित मुलीसोबत झालेला सर्व प्रकार विचारला गेला.
यानंतर या घटनेची माहिती रूग्णालयातील परिसरात पसरल्याने स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला. याप्रकरणात मुलीचे कुटुंबीय आणि इतर नातेवाईक रूग्णालयात पोहोचले आणि त्यांनी आरोपीला मारहाण केली होती. याप्रकरणातील माहिती हावडा पोलिसांना मिळताच घटनास्थळ गाठून आरोपीला जमावापासून वाचवून ताब्यात घेतले. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
यावेळी घडलेल्या घटनेची माहिती मुलीने सांगितली, आरोपीने तिची पॅन्ट घडण्याचा प्रयत्न केला आणि विचारले की तिने तु अश्लील व्हिडिओ पाहिलेत का? त्यावेळी आरोपीने पीडितेचे चुंबनही घेतले. काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी म्हणाले की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या जबाबदारीपासून पळत आहेत आणि त्यामुळे सीबीआयला दोष देत आहेत. याप्रकरणाला आता राजकीय रंग प्राप्त होऊ लागला आहे असे म्हटले तरीही वावगे ठरणार नाही.