सायबर क्राइमचा सामना करणार 'कॅशफ्री पेमेंट्स'चे ‘रिस्कशील्ड’

09 Aug 2024 17:24:17
cashfree payments riskshield cyber crime


मुंबई :          देशात डिजिटल क्रांतीमुळे पुढील काही वर्षांत १ अब्ज यूपीआय व्यवहार होण्याची शक्यता आहे. सध्या, जगातील सर्व डिजिटल पेमेंटपैकी ४६ टक्के प्रमाणासह भारत डिजिटल पेमेंटमध्ये जागतिक अग्रणी म्हणून उदयास येत आहे, असे कॅशफ्री पेमेंट्सचे सीईओ आणि संस्थापक आकाश सिन्हा म्हणाले. ते पुढे म्हणाले, वाढत्या डिजिटल अर्थव्यवस्थेतील व्यवसायांसाठी डिजिटल पेमेंटचा लाभ घेणे अजिबात चुकवू नये, असे धोरण आहे. दुसरीकडे, डिजिटल पेमेंटमध्ये वाढ झाल्यामुळे ऑनलाइन फ्रॉडचे प्रमाणही वाढले आहे, असेही सिन्हा यावेळी म्हणाले.

दरम्यान, गेल्या तीन वर्षांत ऑनलाइन घोटाळ्यांमुळे १.२५ लाख कोटी रुपये इतका तोटा झाला आहे. याचा प्रतिकार करण्यासाठी आरबीआयने व्यक्ती आणि व्यवसायांचे संरक्षण करण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या विविध समित्या स्थापन केल्या आहेत. तसेच, यांसारख्या संभाव्य धोक्यांचा सामना करण्यासाठी वित्तीय क्षेत्र अधिकाधिक अत्याधुनिक तंत्रज्ञानाकडे वळत आहे. कॅशफ्री पेमेंट्सच्या माध्यमातून ऑनलाइन फसवणुकीपासून व्यवसायांचे संरक्षण करण्यात तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण भूमिका बजावते आणि व्यवसायांना देशाच्या वाढत्या डिजिटल अर्थव्यवस्थेचा लाभ घेण्यास सक्षम करते, असेही ते म्हणाले.

सिन्हा पुढे म्हणाले, “कॅशफ्री पेमेंट्समध्ये आम्ही व्यवसायांना सायबर क्राइमचा सामना करण्यासाठी सर्वसमावेशक रिस्क मॅनेजमेंट उपाय प्रदान करण्यासाठी व्यापक संशोधनाद्वारे ‘रिस्कशील्ड’ तयार केले आहे. उच्च चार्जबॅक्स आणि फ्रॉड यासारख्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी डिझाइन केलेले, ‘रिस्कशिल्ड’ आर्थिक सेवा, ई-कॉमर्स व प्रवास यांसह विविध क्षेत्रांमध्ये प्रभावी आहे. ॲडव्हान्स्ड एआय आणि एमएल अल्गोरिदमचा वापर करून, रिस्कशिल्ड व्यवसायांना फसवणुकीचे प्रकार ४० टक्क्यांपर्यंत कमी करण्यास मदत करते.








Powered By Sangraha 9.0