सिटीलाईट परिसरातील अनाधिकृत फेरीवाल्यांचा बंदोबस्त करा!

05 Aug 2024 12:06:32
priti satam on Unauthorized Hawkers


मुंबई:
गोरेगाव पूर्वेला सिटीलाईट गार्डन सोसायटी परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे सिटीलाईट परिसरातील अनाधिकृत फेरीवाल्यांचा बंदोबस्त करा,अशी मागणी स्थानिक नगरसेविका प्रीती सातम यांनी पालिकेकडे केली आहे.

एप्रिल महिन्यात याचं परिसरात रस्त्यावरील शोरमा खाल्याने १५ जणांना विषबाधा झाली होती. तरी सुद्धा महिन्याभरात पुन्हा या परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांचा सुळसुळाट पाहायला मिळाला. यासंदर्भात स्थानिक नगरसेविका प्रीती सातम यांनी पी/ दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय जाधव यांच्याकडे तक्रार केली आहे.या तक्रारीत त्यांनी अनधिकृत फेरीवाल्यांना हटवण्याची आणि कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. तरी :दै. मुंबई तरुण भारत'ने प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन स्थानिकांशी बातचीत केली. यावेळी तातडीने गोरेगाव फिल्म सिटी रोडवरील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करून परिसर कायमचा फेरीवाला मुक्त करावा, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

स्थानिक नगरसेविका म्हणून आम्ही पालिकेकडे वारंवार तक्रारी करत असतो. आता ही काही प्रमाणात अनधिकृत फेरीवाल्यांचा त्रास कमी झालंय. परंतु यापुढे एकही फेरीवाला इथे दिसल्यास आम्ही रस्त्यावरून उतरून आंदोलन करणार आहोत.

प्रीती सातम, स्थानिक नगरसेविका ( भाजप)

पालिकेने या अनधिकृत फेरीवाल्यांचा कायमचा बंदोबस्त करावा अशी आम्हा रहिवाश्यांची मागणी आहे.

राकेश यादव,स्थानिक रहिवाशी

माझ्या घरातील चार जणांना एप्रिल सिटीलाईट परिसरातील शोरमा खाऊन विषबाधा झाली होती. तरी सुद्धा वारंवार पालिकेचे लक्ष वेधून ही फेरीवाले उघड्यावर खाद्य पदार्थांची विक्री करत असतात.

राजू खान, स्थानिक रहिवाशी


Powered By Sangraha 9.0