रिअल इस्टेट एजंटच्या परीक्षेचा निकाल जाहीर! 'या' दोघांना मिळाले १०० टक्के गुण

05 Aug 2024 15:35:09

real estate
 
मुंबई : स्थावर संपदा क्षेत्रातील एजंटसच्या नुकत्याच झालेल्या पाचव्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून ४७६९ पैकी ४१६५ उमेदवार यशस्वी झालेले आहेत. या पाचव्या परीक्षेचा निकाल ८७ टक्के लागला आहे. पाचव्या परीक्षेला ४७६९उमेदवार बसले होते. या निकालात मुंबईच्या शरद मोटा आणि पुण्याच्या दिवेश माहेश्वरी या दोघांनी १०० टक्के गुण मिळवून संयुक्तपणे गुणानुक्रमे पहिले स्थान मिळवले आहे.
 
महारेराने १० जानेवारी २३च्या आदेशान्वये एजंटसच्या नवीन नोंदणी आणि नूतनीकरणासाठी प्रशिक्षण घेऊन विहीत प्रमाणपत्र प्राप्त केलेले असणे बंधनकारक केलेले आहे. राज्यात सुमारे ४७ हजार एजंटस नोंदणीकृत होते. यापैकी १३ हजार ७८५ एजंटसनी नुतनीकरण न केल्याने त्यांची नोंदणी रद्द करण्यात आलेली आहे.त्यानंतर एप्रिल अखेर महारेराने २० हजार पेक्षा जास्त एजंटसनी प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र मिळविण्याच्या अटींची ३१ डिसेंबर पर्यंत पूर्तता केली नाही म्हणून त्यांची नोंदणी स्थगित करून त्यांना काही अटींसापेक्ष या क्षेत्रात काम करायला बंदी घातलेली आहे.
 
स्थावर संपदा क्षेत्रातील 'एजंट' हा घर खरेदीदार आणि विकासक यांच्यातील अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे . बहुतेकवेळा ग्राहक पहिल्यांदा एजंटसच्याच संपर्कात येतात. ग्राहकांना प्रकल्पाच्या अनुषंगाने प्राथमिक माहिती त्यांच्याकडूनच मिळते. एजंटसचे हे महत्त्व लक्षात घेऊन या क्षेत्रात कार्यरत सर्व एजंटसना रेरा कायद्यातील महत्वाच्या तरतुदी माहीत असायला हव्यात.
 
त्यांच्याकडून ग्राहकाला आदर्श विक्री करार, घर नोंदणी केल्यानंतर दिले जाणारे नोंदणी पत्र चटई क्षेत्र, दोष दायित्व कालावधी अशासारख्या विनियामक तरतुदींची प्राथमिक माहिती देताना त्यात समानता, सातत्य आणि स्पष्टता असायला हवी. या माहितीच्या आधारेच ग्राहक घरखरेदीचा निर्णय घेतात. म्हणून ग्राहकहित डोळ्यासमोर ठेवूनच महारेराने हे प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र बंधनकारक केलेले आहे.
 
पहिली परीक्षा ४१६५
दुसरी परीक्षा ४०५
तिसरी परीक्षा २८१२
चौथी परीक्षा ४४६१
पाचवी परीक्षा १५२७
एकूण पात्र १३,३७०
 
 
Powered By Sangraha 9.0