"हिंदू मुलाशी बोललीस का?", कट्टरपंथींनी युवतीचा बुरखा ओढत केले अत्याचार

31 Aug 2024 17:49:06

Burqa Tear 
 
लखनऊ : हिंदू मुलासोबत का बोलली असा सवाल करत कट्टरपंथी तरूणाने पीडितेला मारहाण केली. त्यावेळी तिचा बुरखा ओढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे घडला आहे. याप्रकरणी आता तरूणीने अज्ञातांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे. घटनास्थळी उपस्थितांनी आरोपींना नझीम आणि वसीम अशी हाक दिल्याचा आरोप पीडितेने केला होता. दरम्यान ही घटना २९ ऑगस्ट रोजी घडली आहे.
 
ही घटना मुरादाबाद येथील असून ३० ऑगस्ट रोजी पीडितेने आरोपींची पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पीडितेच्या तक्रारीनुसार , पीडित युवती ही एका ठिकाणी नोकरी करत आहे. ती सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ती आपल्या घरी परतत होती. इतक्यात एका तरूणाने तिला थांबवले. तो म्हणाला की, तु हिंदू मुलाशी का बोलतेस? त्यावेळी तिने तो आपल्या भावासारखा असल्याचे सांगितले. तेव्हा त्या युवकांनी पीडितेचा बुरखा ओढला. संबंधित युवक हे पीडितेच्या घराच्या परिसरात राहतात अशी माहिती तिने तक्रारीत दिली आहे.
 
पीडितेने व्हिडिओच्या माध्यमातून घडलेल्या घटनेप्रसंगी सांगितले की, दोन्ही आरोपी जेव्हा गैरवर्तन करत होते त्यावेळी घटनास्थळी असलेली लोकं वसीम आणि नाझीम अशी हाक देत होते. पीडितेने व्हिडिओमध्ये प्रतिक्रिया देताना सांगितले की, जर घटनास्थळी बचावकर्ते आले नसते तर कदाचित आरोपींनी पीडितेला जीवे मारले असते.
 
दरम्यान याप्रकरणात पोलिसांनी घडलेल्या घटनेची दखल घेत आरोपींवर एफआऱआय दाखल केली. तसेच भारतीय न्याय संहिता कलम १२६ (२), ७४ आणि ३५२ अंतर्गत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0