कोलकाता : प. बंगाल येथील तृणमूल काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाला गुरूवारी २९ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आल्याची घटना घडली आहे. १३ वर्षीय आदिवासी मुलींवर लैंगिक अत्याचार आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याचे कारण सांगितले गेले आहे. पश्चिम बंगालमधील दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील गंगारपूर उपविभागातील बंशीहारी य़ेथे ही घटना घडली. राष्ट्रीय मथळ्य़ानंतर राज्य सरकारने दखल घेत कारवाई केली.
प्रसारमाध्यमाने दिलेल्या माहितीनुसार, प्रियनाथ राजबंशी असे आरोपीचे नाव असून तो तृणमूल काँग्रेसचा बुथ अध्यक्ष नरेश राजबंशींचा मुलगा आहे. आरोपीच्या कुटुंबातील अनेक कुटुंबातील अनेक सदस्य तृणमूल काँग्रेस पक्षाशी संबंधित आहेत. अशाप्रकारे आरोपीचे कुटुंब हे परिसरातील प्रभावशाली कुटुंबांपैकी एक आहेत.
प्रियनाथ राजबंशी याने बुधवारी २८ ऑगस्ट रात्री बळजबरीने पीडितेच्या घरात घुसून हैवानी कृत्य केले. बलात्कारानंतर त्याने अल्पवीयन मुलीचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला असल्याचे बोलले जात आहे, यावेळी अल्पवयीन मुलीने आरडाओरड केली. त्यावेळी पीडीतेच्या आई घटनास्थळी धाव घेतली असून त्यावेळी आरोपीने घटनास्थळावरून पळ काढला.
याप्रकरणात अल्पवयीन मुलीच्या मानेवर खोलवर जखमा झाल्या आहेत. त्यांना उपचारासाठी रूग्णलयात दाखल करण्यात आले आहे. पीडितेची प्रकृतीबाबतची माहिती मिळाली असून सध्या तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले गेले. या घटनेत अल्पवयीन मुलीच्या मानेवर खोलवर जखमा झाल्या आहेत. त्यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पीडितेची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्यावर गंगारामपूर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे बंशीहारी परिसरात भीतीचे व गोंधळाचे वातावरण आहे. या घटनेची माहिती गुरूवारी २९ ऑगस्ट रोजी पोलिसांना मिळाली असून पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी आरोपीचे कपडे जप्त केले. यावेळी त्यांनी छापा टाकत आरोपीला ताब्यात घेतले.