नवी दिल्ली : पाकिस्तानला धूळ चारणारे अधिकारी एअर मार्शन डेंजिल जोसेफ किलर यांचे बुधवारी सायंकाळी निधन झाले असून ते ९० वर्षांचे होते. त्यांचा जन्म १९३३ मध्ये लखनऊ, उत्तर प्रदेश येथे झाला. १९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील हिरो म्हटले तरीही वावगे ठरणार नाही. त्यांनी गुरूग्राम येथे अखेरचा श्वास घेतला.
दिल्लीतील कॅट येथील स्मशानभूमीत लष्करी सन्मानाने त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. १९६५ नंतर १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धातही त्यांनी सहभाग घेतला होता. या युद्धामुळे स्वतंत्र बांगलादेश स्थापन झाला. तसेच डेंजिल यांचा भाऊ ट्रेवर किलरही सैन्यात अधिकारी होता. किलर बंधूंनी १९६५ मधील युद्धात चांगली कामगीरी केली होती. ते दोघेही फायटर पायलट म्हणून काम करत होते.
१९९५ साली किलर बंधूंनी पाकिस्तानचे लढाऊ विमान सबरजेट खाली पाडले होते. पाकिस्तासोबत तत्कालीन युद्ध आपली माघार घेत लढाईत त्यांचा पराभव झाला होता. डेंजिल यांनी १९७१ साली पाकिस्तानविरोधात लढत असताना ते गंभीर जखमी झाले होते. ते उंचीवरून विमान उडवत असताना त्यांना दुखापत झाली आणि ते गंभीर जखमी झाले होते. एक वैंमानिक म्हणूनही त्यांची ओळख आहे.