आदिलचा झाला अमन खरी ओळख लपवून हिंदू मुलीशी केली मैत्री, विश्वास संपादन करत युवती झाली लव्ह जिहादची शिकार

30 Aug 2024 16:54:55

Love Jihad
 
लखनऊ : एका कट्टरपंथी तरूणाने आपली ओळख लपवून हिंदू असल्याचे सांगून हिंदू युवतीसोबत लव्ह जिहाद केला. आपले मूळ नाव आदिल असूनही त्याने आपण अमन असल्याचे सांगून सोशल मीडियावर हिंदू मुलीशी मैत्री करत मुलीला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यानंतर कट्टरपंथी आदिलने मुलीपासून सुटका मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले असता त्यातून हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. उत्तर प्रदेशातील अमरोह येथील ही घटना असून पोलीस याप्रकरणी सतर्क झाले आहेत.
 
कट्टरपंथीने ओळख लपवून हिंदू मुलीचे केले लैंगिक शोषण
 
अमरोह येथे आदिल नावाच्या जिहादीने इंस्टाग्राम अकाऊंटवरून अमन असे नाव लावत एका हिंदू मुलीशी मैत्री केली, तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला फसवले आणि लग्न करू या बहाण्याने तिच्यावर अनेकदा लैंगिक अत्याचार केले. हे प्रकरण इथेच न थांबता त्याने पीडितेला हत्यारे दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणात पीडितीने पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.  
 
 
 
पीडितेने आपल्या तक्रारीत पोलिसांना सांगितले की, इंस्टाग्रामवर अमन नावाच्या तरूणासोबत तिची मैत्री झाली होती. तो गरीब कुटुंबाचा असल्याने तिने त्या मुलासोबत विवाह करण्यासाठी होकार दिला होता. आरोपी आदिल पीडितेला अमरोह येथील त्याच्या घरी घेऊन जायचा. ज्यावेळी पीडितेला कळाले की अमन हा आदिल आहे. त्याने खोट्या नावाचा वापर करत पीडितेला धर्मांतरण करण्यास जबरदस्ती केली आणि शाऱिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर तिने आदिलच्या तावडीतून २० दिवसांनंतर कशीबशी सुटका केली आणि एसपी ऑफिसमध्ये तक्रार दाखल केली.
याप्रकरणी पोलीस अधिकारी राजीव कुमार सिंह यांनी पीडितेने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर तक्रार नोंदवून घेतली. याप्रकरणात मुलीची फसवून करून तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेवण्यात आल्याचे सांगितले गेले. आरोपीने मुलीला बंदुकीचा धाक दाखवून हे करण्यास भाग पाडले, मात्र आम्ही पीडितेची तक्रार नोंदवून घेतली आहे, असे पोलीसांनी सांगितले.
 
Powered By Sangraha 9.0