सिंधुदुर्ग : राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणात पहिली अटक करण्यात आली आहे. स्ट्रक्चरल कन्सलटंट चेतन पाटील याला कोल्हापूरातून पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून ही करण्यात आली आहे.
२६ ऑगस्ट रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अचानक कोसळला. या पुतळ्याचे काम मेसर्स आर्टीस्ट्री कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीचे मालक जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट केतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेनंतर ते दोघेही फरार झाले होते.
हे वाचलंत का? - वाढवण बंदरावर संपुर्ण जगाचं लक्ष! यामुळे महाराष्ट्राचं आर्थिक चित्र बदलणार : पंतप्रधान नरेंद्र मोदी
त्यानंतर आता यातील स्ट्रक्चरल कन्सल्टंट चेतन पाटील याला गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोल्हापूर पोलिसांनी केतन पाटील याला अटक केली आहे. गुरुवारी रात्री उशिरा त्याला अटक करून पुढील तपासासाठी सिंधुदुर्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.