टेक्सासमध्ये उभारलेला हनुमंतांच्या पुतळ्याने ख्रिश्चनांना पोटदुखी?

29 Aug 2024 17:58:54

Texas Hanuman Statue News

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :
  (Texas Hanuman Statue Controversy) टेक्सासच्या शुगरलॅण्ड येथील श्री. अष्टलक्ष्मी आश्रमात हनुमंताची ९० फूट उंचीची मूर्ती उभारण्यात आली आहे. या पुतळ्याचे अनावरण गुरुवार दि. १५ ऑगस्ट रोजी करण्यात आले. मात्र तिथल्या ख्रिश्चन परंपरावाद्यांनी त्याला विरोध सुरू केला आहे. 'न्यूजवीक' नामक अमेरिकन मासिकाने हे वृत्त प्रकाशित करताना आपल्या मथळ्यात हनुमंताचा 'अर्धा माकड, अर्धा मानव' असा उल्लेख केला आहे.

हे वाचलंत का? : इस्लामपूर नव्हे ईश्वरपूर म्हणा! नितेश राणेंचं जनतेला आवाहन

स्टॅच्यू ऑफ युनियन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पुतळ्यास काही ख्रिश्चनांनी 'शैतानी' म्हणत आक्षेप घेतल्याचा दावा न्यूजवीकने केला आहे. 'वन गॉड' नावाचा कपड्यांचा ब्रँड चालवणाऱ्या मॉर्गन एरियलने या पुतळ्याचा व्हिडिओ शेअर केला आणि त्याच्याविरोधात वादग्रस्त टिपण्णी केली आहे. 'एंड टाइम हेडलाइन्स' नावाच्या मीडिया संस्थेनेही यास 'शैतानी' म्हटले आहे. त्यांनी हनुमंतास 'मांकी गॉड' असेही संबोधले आहे. 'एएफ पोस्ट'ने 'हिंदू शैतान' म्हणून वर्णन केले आहे.

एक्स प्लॅटफॉर्मवर अनेक लोकांनी स्पष्टपणे लिहिले आहे की हनुमान हिंदू धर्मातील एक देवता आहे, जी बुद्धिमत्ता, सामर्थ्य आणि धैर्याचे प्रतीक आहे. लोकांनी लिहिले की श्री रामचा निस्सीम भक्त हनुमान हे अमर आहे. त्याची तुलना ख्रिश्चन देवदूतांशी करणे योग्य होणार नाही. काही कट्टरपंथी ख्रिश्चन मीडिया संस्थांना इतके वेडे झाले की त्यांनी असे लिहायला सुरुवात केली की सर्वत्र 'शैतानांचे' पुतळे बसवल्यास या भागाला 'खऱ्या देवाच्या' रोषाला सामोरे जावे लागेल.
Powered By Sangraha 9.0