"नेता असावा तर असा", रवींद्र जडेजाची पत्नी भाजप नेत्या रिवाबा पूरग्रस्तांच्या मदतीला, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

29 Aug 2024 16:31:19

Rivaba Jadeja
 
गांधीनगर : गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने हाहाकार माजला आहे. या पावसामुळे गुजरात येथील वडोदरा शहरातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. यामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली असून तब्बल २८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यावर आता प्रशासन अलर्ट मोडवर असून भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी आणि भाजप आमदार रिवाबा जडेजा जामनगर येथील पूरपरिस्थिची आढावा घेण्यासाठी गेल्या असता पूरजन्य परिस्थितील १० ते १५ फुट पाण्यात उतरल्या आहेत. याचा पती जडेजाला भलताच अभिमान वाटू लागला आहे.
 
पूरग्रस्तांच्या सुरक्षेपोटी जामनगर येथील स्थानिक ठिकाणी जाऊन त्यांनी पाहाणी केली त्या स्वत: कंबरेइतक्या पाण्यात उभ्या राहून सामान्यांची समस्या जाणून घेत होत्या. याचा व्हिडिओ स्वत: रवींद्र जडेजाने शेअर केला असून रिवाबा पुराच्या पाण्यात शिरताना आणि अडकलेल्या लोकांना वाचवताना दिसत आहे. रिवाबा या पूरग्रस्तांना घरातून बाहेर काढण्याची मदत करत आहे.
 
 
 
यावेळी व्हिडिओ शेअर करत स्वत: रिवाबा म्हणाल्या की, "आपल्या नशीबावर आपला ताबा नसेल तर आपण किमान लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करू", यावेळी आपली पत्नी रिवाबाचे कौतुक करत रवींद्र जडेजा म्हणाला की, "मला तुझा सार्थ अभिमान आहे," त्यावेळी काहींनी नेता असावा तर असा जो अशा स्थितीत लोकांच्या मदतीला येईल, असे म्हणत रिवाबांचे अनेकांनी कौतुक केले. 
 
 
 
त्यावेळी सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओला अनेकांनी दाद दिली,"एवढ्या वर्षांनंतर जामनगर येथे असा नेता मिळाला आहे" "दुसऱ्याने पोस्ट शेअर करत लिहिले की, नेता असावा तर असा आपण सामान्यांसाठी चक्क पाण्यात उतरला आहात". तसेच तिसऱ्याने पोस्ट करत लिहिले की, "जर देशातील आमदार-खासदार अशाच पद्धतीने काम करू लागले तर देशात रामराज्य यायला फार वेळ लागणार नाही"
 
 
 
याप्रकरणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांची भेट घेतली आणि सर्व माहिती जाणून घेतली. गुजरात येथील अकरा जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच उर्वरित २२ जिल्ह्यांमध्ये पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आल्याचे सांगितले.
 
Powered By Sangraha 9.0