मदरशातील बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश; मास्टरमाइंडसह दोघांना अटक

29 Aug 2024 13:45:15

Fake currency racket busted in Madrasas

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Fake currency racket)
उत्तर प्रदेशच्या प्रयागराज पोलिसांनी शहरातील एका मदरशात कार्यरत असलेल्या बनावट नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ज्यामुळे मदरशाचे मुख्याध्यापक, मोहम्मद तफसीरुल, मास्टरमाइंड, जहीर खान उर्फ अब्दुल जहीर आणि इतर दोन विद्यार्थी, मोहम्मद अफजल आणि मोहम्मद शाहिद यांना अटक करण्यात आली आहे. जामिया हबीबिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मदरशाचा वापर बनावट नोटा छापण्यासाठी केला जात होता. बुधवारी (२८ ऑगस्ट) झालेल्या छापेमारीत अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून १३०० बनावट १०० रुपयांच्या नोटा, छापील बनावट चलनाच्या २३४ शीट्स, कागदाचे तीन बंडल, एक प्रिंटर, एक कटर, एक लॅपटॉप आणि इतर संबंधित वस्तू जप्त केल्या आहेत.

हे वाचलंत का? : विद्युत खांबांवरील हिंदू धार्मिक चिन्हांवर 'SDPI'ने घेतला आक्षेप

या कारवाईची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, सिव्हिल लाइन्स पोलिसांना सिव्हिल लाइन्स बसस्थानकावर बनावट नोटा चलनात आणण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींची माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकून तीन संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीनंतर बुधवारी संबंधित मदरशात छापा टाकला, ज्याठिकाणी एका खोलीत बनावट नोटा छापल्या जात होत्या. मदरशाचे कार्यकारी मुख्याध्यापक मौलवी मोहम्मद तफसीरुल आरिफीन यांनाही अटक करण्यात आली आहे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार कारवाईत मुख्याध्यापक सक्रियपणे सहभागी होते, त्यांनी टोळीला बनावट नोटा छापण्यासाठी स्वतंत्र खोली उपलब्ध करून दिली होती. या टोळीचा म्होरक्या झहीर खान हा ओरिसा येथील मदरसाचा विद्यार्थी असून तो यासर्वाचा सूत्रधार होता.
Powered By Sangraha 9.0