शिवरायांचा पुतळा बनवणारा शिल्पकार आणि कंत्राटदार फरार!

29 Aug 2024 15:02:47
 
Jaydeep Apte
 
मुंबई : मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याने राज्यभर सध्या संतापाचं वातावरण आहे. दरम्यान, हा पुतळा उभारणारा शिल्पकार आणि कंत्राटदार फरार झाल्याची माहिती पुढे आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट केतन पाटील हे दोघेही फरार झाले आहेत.
 
सोमवार, २६ ऑगस्ट रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अचानक पुतळा कोसळला. या पुतळ्याचे काम मेसर्स आर्टीस्ट्री कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीचे मालक जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कन्सल्टंट केतन पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानतंर आता ते दोघेही फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
हे वाचलंत का? -  "पुतळा तयार करणारा राहुल गांधींचा निकटवर्तीय!"
 
जयदीप आपटे हा कल्याणमध्ये राहत असून या घटनेनंतर घराला कुलूप लावून तो फरार झाल्याची माहिती पुढे आली आहे. तसेच केतन पाटीलसुद्धा फरार असून त्यांचा शोध सुरु आहे. या दुर्घटनेनंतर राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा करण्याची ग्वाही दिली आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0