एनएसई एमडी आशिषकुमार चौहान यांचा 'मोस्ट इनफ्ल्यूएन्शियल सीईओ' पुरस्काराने गौरव

28 Aug 2024 19:02:40
md ashishkumar chauhan most influential ceo
 

मुंबई : राष्ट्रीय शेअर बाजार(एनएसई इंडिया)चे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ आशिषकुमार चौहान 'मोस्ट इनफ्ल्यूएन्शियल सीईओ २०२४' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान म्हणजे आशिषकुमार चौहान यांच्या दूरदर्शी नेतृत्वाचा आणि उत्कृष्ट समर्पणाचा पुरावा आहे, अशी भावना एनएसई इंडियाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, एमडी चौहान यांचा एआय ग्लोबल मीडिया द्वारे 'मोस्ट इनफ्ल्यूएन्शियल सीईओ २०२४' (नॅशनल फायनान्शियल ट्रेडिंग)दक्षिण आशिया विभागात गौरव करण्यात आला आहे. चौहान यांनी इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडियामध्ये प्रोजेक्ट फायनान्स ऑफिसर (१९९१-९३) म्हणून आपली कारकीर्द सुरू केली. १९९३-२००० दरम्यान त्यांनी नॅशनल स्टॉक एक्सचेंज(एनएसई) स्थापना आणि संचालनाकरिता नियुक्त पाच सदस्यीय संघात काम केले आहे.



Powered By Sangraha 9.0