मॉब लिचिंग दाखवत खोटा प्रचार; पोलीस तपासात धक्कादायक खुलासे उघड

27 Aug 2024 18:21:56
mob lynching rumours police report 


नवी दिल्ली :         उत्तराखंडमधील हरिद्वारमध्ये एका कट्टरपंथीयाचा तलावात उडी मारून मृत्यू झाला. हा तरुण पोलिसांच्या गोरक्षक पथकापासून स्कूटरवरून पळत होता. यात कट्टरपंथीयाने तलावात उडी मारल्याने मृत्यु झाला असून उत्तराखंड पोलिसांनी केलेल्या तपासात सत्य उघड झाले आहे. दरम्यान, तलावात उडी मारून झालेल्या मृत्युस मॉब लिंचिंग म्हणून भासवण्यात आले आहे.




ही घटना दि. २६ ऑगस्ट २०२४ रोजी घडली असून हरिद्वार पोलिसांचे गोवंश पथक रुरकी अंतर्गत येणाऱ्या माधोपूर गावात गेले होते. येथे काही लोक गोहत्येत सहभागी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांनी परिसराची चौकशी सुरू केली. त्यानंतर पोलिसांना एक तरुण स्कूटरवरून येताना दिसला, त्याला त्यांनी थांबवण्याचा प्रयत्न केला. या तरुणावर गोमांस आणल्याचा संशय होता. पोलिसांनी अडवूनही तो तरुण थांबला नाही आणि स्कूटरवरून पळून गेला. पथकाने पाठलाग केला असता त्याने तलावात उडी मारल्याने तलावात बुडून त्याचा मृत्यू झाला.

इस्लामिक हँडलकडून या घटनेस मॉब लिचिंग असा खोटा प्रचार करत घटनेतील सत्यता लपवून ठेवली. अखेर पोलिसांनी या घटनेतील तथ्य तपासले त्यानंतर तीन जणांवर गुन्हे नोंदविण्यात आला आहे. दरम्यान, तरुणाचा शोध घेण्यासाठी गोताखोरही तलावात गेले मात्र त्यांना यश आले नाही. सकाळी मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला असून त्याचे पोस्टमॉर्टम अहवाल येणे बाकी आहे.





Powered By Sangraha 9.0