बायडेन प्रशासनाने माझ्यावर दबाव टाकला, सीईओंच्या पत्रात धक्कादायक खुलासा

27 Aug 2024 15:46:22
meta biden administration ceo letter


नवी दिल्ली :           बायडेन प्रशासन आपल्यावर दबाव आणत होते. कोव्हिड काळातील माहिती दडपण्यासाठी मेटावर दबाव टाकण्यात आला, असा खुलासा मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी एका पत्रात नमूद केले आहे. तसेच, बायडेन प्रशासनाकडून व्यंगचित्र काढून टाकण्यासाठी आपल्यावर दबाव टाकण्यात आला. त्याचबरोबर, बायडेन प्रशासनाने डेमोक्रॅट पक्षाला देणगी देण्याबाबत स्पष्टीकरणही दिले आहे.


दरम्यान, मार्क झुकरबर्ग यांनी दि.२६ ऑगस्ट २०२४ रोजी हे पत्र जारी केले आहे. यात झुकेरबर्ग यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. २०२१ मध्ये व्हाईट हाऊससह बिडेन प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आमच्या कार्यसंघांवर अनेक महिन्यांपासून व्यंगचित्रांसह काही कोव्हिड-१९ सामग्री सेन्सॉर करण्यासाठी वारंवार दबाव आणला. तसेच, जेव्हा आम्ही सहकार्य केले नाही तेव्हा आमच्या टीमने निराशा व्यक्त केली. अखेर कोणतीही सामग्री काढायची की नाही हा आमचा निर्णय होता आणि आम्ही आमच्या निर्णयांसाठी जबाबदार आहोत, असा खुलासा त्यांनी पत्रात केला आहे.

बायडेन सरकारने माझ्यावर दबाव आणत फेसबुक-इन्स्टाग्रामवरून माहिती काढून टाकण्यास सांगितले, असे मेटा सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी उघड केले आहे. २०२० च्या अध्यक्षीय निवडणुकीदरम्यान मेटाने बायडेन कुटुंबाविषयी प्रकाशित केलेली कथा त्यांच्या व्यासपीठावरून थांबवल्याचा खुलासाही मार्क झुकरबर्गने केला आहे. एफबीआयच्या सांगण्यावरून हे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यापुढे असे करणार नाही आणि कोणतीही गोष्ट थांबविणार नाही, असे झुकेरबर्गने म्हटले आहे.




Powered By Sangraha 9.0