नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यादी जाहीर झाल्यानंतर यात एकमेव महिला उमेदवार शगुन परिहार यांच्या नावाची सर्वाधिक चर्चा होत आहे. शगुन परिहार यांना किश्तवाडामधून उमेदवारी देण्यात आली असून त्यांचे काका अनिल परिहार हे जम्मू-काश्मीरमधील भाजपचे दिग्गज नेते राहिले आहेत.
दरम्यान, भाजप उमेदवार परिहार यांचे वडील आणि काका यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती. काका अनिल परिहार हे जम्मू-काश्मीरमधील भाजपचे दिग्गज नेतेदेखील होते. त्यांच्याकडे राज्यातील भाजपच्या सचिवपदाची जबाबदारी होती. राजकीय कारकिर्दीत प्रगती करत असताना इस्लामिक कट्टरपंथीयांकडून २०१८ मध्ये अनिल परिहार आणि शगुन परिहार यांच्या वडिलांची हत्या झाली.
पक्षाने दिलेल्या उमेदवारीनंतर शगुन परिहार यांनी सांगितले की, मी खूप भावनिक आहे मला दिलेल्या उमेदवारीबद्दल पंतप्रधान मोदींचे आभारदेखील मानले आहेत. तो काळोख दिवस माझ्या डोळ्यात अजूनही ज्वलंत आहे. ज्या दिवशी माझे घर उध्वस्त झाले होते, माझ्या कुटुंबाने त्यांच्या रक्ताचा प्रत्येक थेंब किश्तवाडसाठी दिला होता, ही निवडणूक त्यांच्यासाठी आहे, अशा भावना शगुन परिहार यांनी व्यक्त केल्या आहेत.