रत्नागिरीत २० वर्षीय नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार

27 Aug 2024 15:13:55

Nurse Protest (Ratnagiri)

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Ratnagiri Nurse Protest News)
रत्नागिरीमध्ये एका २० वर्षीय नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित विद्यार्थीनी चंपक मैदानाजवळ बेशुद्ध आणि गंभीर जखमी अवस्थेत आढळली होती. तिला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले असता तिच्यावर क्रूर लैंगिक अत्याचार झाल्याची माहिती मिळत आहे.

हे वाचलंत का? : संपूर्ण हिंदू गावावर वक्फ बोर्डाचा दावा

या घटनेमुळे रत्नागिरीतील नर्सिंग वर्गात खळबळ उडाली आहे. या गुन्ह्यासाठी जबाबदार असलेल्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी नर्सेस आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाबाहेर निदर्शने केली. इतर समर्थकांसह रुग्णालयातील कर्मचारी रस्त्यावर उतरल्याने रत्नागिरीतील अनेक भागात वाहतूकवर परिणाम झाला. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून, आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ९ ऑगस्ट रोजी बलात्कार आणि हत्या करण्यात आलेल्या ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरला न्याय मिळावा या मागणीसाठी देशभरात झालेल्या निदर्शने होत असताना रत्नागिरीची घटना उघडकीस आली. त्यामुळे महिला सुरक्षेबद्दलच्या चिंतेचा हवाला देऊन मजबूत सुरक्षा कायद्यांची मागणी करण्यात आली आहे.
Powered By Sangraha 9.0