मुंबईत शरद पवार गटाकडून 'इतक्या' जागांची मागणी! मविआचा तिढा सुटणार?

27 Aug 2024 13:41:30
 
MVA
 
मुंबई : लोकसभेप्रमाणेच विधानसभेतही महाविकास आघाडीमध्ये(मविआ) जागावाटपावरून धुसफूस सुरु असल्याची माहिती पुढे आली आहे. जागावाटपासंदर्भात मविआतील पक्षांमध्ये बैठकांचे सत्र सुरु आहे. परंतू, मुंबईतील जागांवरून तोडगा निघताना दिसत नाही.
 
मुंबईत विधानसभेच्या ३६ जागा आहेत. यापैकी उबाठा गटाने २० ते २२ जागांची मागणी केल्याची माहिती सुत्रांकडून पुढे आली आहे. तसेच शरद पवार गटाने ७ जागांची मागणी केल्याचे सांगण्यात येत आहे. यावर आता काँग्रेस काय भूमिका घेतो? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
 
हे वाचलंत का? -  विविध क्षेत्रांत ५ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी! बेलापूरमध्ये रंगणार दहावा महारोजगार मेळावा
 
उबाठा आणि शरद पवार गटाची मागणी मान्य केल्यास काँग्रेसच्या वाट्याला मुंबईत दहापेक्षाही कमी जागा येणार का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. शिवाय मुंबईतील काही जागांवर तिन्ही पक्षांकडून दावा करण्यात येत असल्याचीही माहिती पुढे आली आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीतील हा जागावाटपाचा तिढा सुटणार का? आणि कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0