बांगलादेशचे विभाजन करुन 'हिंदू देश' निर्माण करावा

27 Aug 2024 17:25:16

Swami Bharatanand Maharaj

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Bangladesh Hindu Desh) 
"बांगलादेशातील हिंदूचे हाल बघवत नाहीयेत. भारत सरकारने बांगलादेशी हिंदूच्या रक्षणासाठी कठोर पाऊले उचलावी. बांगलादेशचे विभाजन करुन हिंदू देश निर्माण करावा.", असे प्रतिपादन पालघर येथील हिंदु शक्ती पिठाचे पू. स्वामी भारतानंद सरस्वती महाराज यांनी केले. विश्व हिंदु परिषदेच्या षष्ठपूर्ती वर्षानिमित्त सीबीडी, वाशी येथे आयोजित हिंदु संमेलनात ते बोलत होते. संमेलनाचे प्रास्ताविक विश्व हिंदु परिषदेचे नवी मुंबई सहमंत्री स्वरूप पाटील यांनी केले.

हे वाचलंत का? : बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे नेक रहेंगे’

बांगलादेशातील सद्यस्थितीवर भाष्य करत स्वामी भारतानंद सरस्वती महाराज पुढे म्हणाले, "भारतात विशिष्ट समाजाची लोकसंख्या हिंदुंपेक्षा अधिक प्रमाणात वाढत आहे. यात आणखी भर म्हणजे सध्या देशात १० कोटी घुसखोर आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी जनसंख्या नियंत्रण कायदा मंजूर करणे आवश्यक आहे. समाजानेही पुढाकार घेऊन असा घुसखोरांना शोधून घालवावे लागणार आहे. महाराष्ट्रात ८० लाख घुसखोर असून अशा जिहादी मानसिकतेच्या लोकांनी देशात मिनी पाकिस्तान, बांगलादेश तयार केले आहेत. सध्या आरक्षणापेक्षा देश आणि धर्माचे रक्षण करण्याची आवश्यकता आहे. जात-पात, भाषा, प्रांत, संप्रदाय यांचे सर्व मतभेद बाजूला सारून एक हिंदू म्हणून सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे."

विश्व हिंदू परिषदेच्या कोकण प्रांत मातृशक्ती संयोजिका मनिषा भोईर म्हणाल्या की, ही धर्म युद्धाची लढाई आहे. हिंदु मुली विरूद्ध जिहाद करण्यासाठी जिहादिंची टोळी तयार आहे. हे संविधानानुसार वागत नाही. ही मोगलाई संपवायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराज जन्मावे लागतील. त्यासाठी मातृशक्ती जागृत होणे आवश्यक आहे. प्रत्येकवेळी प्रशासनाने काही करावे याची आपण वाट पहात बसतो; परंतु महिलांकडे वाकड्या नजरेने पहाणाऱ्यांचा चौरंग करण्याचे आदेश छत्रपतींनी दिले होते, हे लक्षात घेण्याची वेळ आली आहे.


Swami Bharatanand Maharaj

बजरंग दलाचे ठाणे विभाग संयोजक सुरज तिवारी म्हणाले की, आज घराघरांत जिजामाता तयार झाल्या तरच शिवाजी महाराज, भगत सिंग जन्माला येतील. कॉन्व्हेन्ट मध्ये मुघलांचा इतिहास शिकवला जात असल्याने आपल्या मुलांमध्ये धर्माभिमान कसा जागृत होईल? यासाठी मुलांना विश्व हिंदु परिषदेच्या गुरुकुल, बालसंस्कार वर्ग, शौर्य प्रशिक्षण वर्गात पाठवण्याची आवश्यकता आहे. सध्या मुलींनी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे.


'लव्ह जिहाद विरोधी' कायदा लवकरात लवकर लागू करा
"राज्य सरकारने लाडकी बहीण योजना चालू केली आहे; मात्र राज्यातील सध्याची परिस्थिती पहाता, मुलींच्या सुरक्षेसाठी 'लव्ह जिहाद विरोधी' कायदा लवकरात लवकर लागू करण्याची अधिक आवश्यकता आहे. जोपर्यंत लव्ह जिहाद विरोधी कायदा बनत नाही तोपर्यंत मुली आणि महिलांनी आत्मसंरक्षणाच्या अधिकाराखाली स्वतःजवळ शस्त्र ठेवावे. ज्याचा वापर कठीण प्रसंगी होऊ शकेल.", असे पू. स्वामी भारतानंद सरस्वती महाराज म्हणाले.

Powered By Sangraha 9.0