टाटा सन्सच्या कर्ज परतफेडीच्या निर्णयाने 'एलआयसी'चा रेकॉर्ड अबाधित; जाणून घ्या प्रकरण काय
26 Aug 2024 19:36:05
मुंबई : देशातील सर्वात मोठ्या उद्योगसमूहापैकी टाटा ग्रुपकडून शेअर बाजारात आपली कंपनी सूचीबध्द करण्याचा निर्णय पुढे ढकलला आहे. टाटा ग्रुपने कंपनी सूचीबध्द न करता २० हजार कोटी रुपयांहून अधिक कर्जाची परतफेड करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. टाटा समूहाची ४१० अब्ज डॉलर होल्डिंग कंपनीकडून एनबीएफसी नोंदणी प्रमाणपत्र आरबीआयकडे सादर केले आहे.
दरम्यान, टाटा सन्सचा आयपीओ येणार नसून कोट्यवधी रुपयांच्या कर्जाची परतफेड केली जाणार आहे. या निर्णयामुळे एलआयसीचा रेकॉर्ड मोडण्यापासून वाचला आहे. टाटा सन्सचा आयपीओद्वारे ५ टक्के हिस्सा विकून सुमारे ५५ हजार कोटी रुपये भांडवल उभारायचे आहे. टाटा सन्सने समूह कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी बाजार आणि बँकांकडून पैसे घेतले होते.
नियमांनुसार, वर्गीकरणाखालील कंपन्यांना स्टॉक एक्स्चेंजमध्ये तीन वर्षांच्या आत सूचीबद्ध करणे आवश्यक आहे. तथापि, टाटा सन्सच्या कर्जाची परतफेड केल्यानंतर प्रमोटर रिस्क प्रोफाईल लक्षणीयरीत्या कमी झाले आहे, त्याचबरोबर, कंपनीने आपले एनबीएफसी नोंदणी प्रमाणपत्रही आरबीआयकडे सादर केले आहे. टाटा सन्सकडे कंपनी स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्ट करण्यासाठी सप्टेंबर २०२५ पर्यंत वेळ होता.