संपूर्ण हिंदू गावावर वक्फ बोर्डाचा दावा

26 Aug 2024 17:25:47

Waqf Board Patna News

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : (Waqf Board Patna News)
पाटणा जिल्ह्यातील एका हिंदू गावावर वक्फ बोर्डाने दावा केला होता. मात्र पाटणा उच्च न्यायालयाने बोर्डाकडून कागदपत्रे मागितली असता ती अस्तित्वात नसल्याचे बोर्डाकडून सांगण्यात आले. त्यामुळे न्यायालयाने वक्फ आदेशाला स्थगिती दिली आहे. पाटणा सचिवालयापासून अवघ्या ३५ किलोमीटर अंतरावर असलेल्या फतुहा येथील गोविंदपूर गावात ही घटना घडली आहे.

हे वाचलंत का? : बस थांबवली! ओळखपत्र तपासत एकेकाला झाडल्या गोळ्या! २३ ठार

भगवान विष्णू यांच्या नावावर असलेले हे गाव आपले असल्याचा दावा सुन्नी वक्फ बोर्डाने केला आहे. घाईगडबडीत वक्फ बोर्डाने महिनाभरात गाव रिकामे करण्याची नोटीसही दिली आहे. वक्फ बोर्डाच्या या तुघलकी आदेशाने गावकरी हैराण झाले आहेत. गावात एकूण ९५ टक्के हिंदू लोकसंख्या आहे. गावाच्या मागे एक मजार आहे. ती मजार आणि आजूबाजूच्या परिसरापासून सुरू होणारी संपूर्ण जमीन स्मशानभूमीची असल्याचे वक्फ बोर्डाचे मत आहे. परंतु सुरुवातीपासून येथे कधीही स्मशानभूमी नसल्याचे गावातील लोकांचे म्हणणे आहे.

गावकऱ्यांनी पाटणा जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे जमिनीच्या मालकीची पडताळणी करण्यासाठी अर्ज केला. त्यावर उत्तर देताना जिल्हाधिकाऱ्यांनी ही जमीन वक्फची नसून तिथे राहणाऱ्यांची असल्याचे लेखी उत्तर दिले आहे. त्यानंतर हे प्रकरण पाटणा उच्च न्यायालयात पोहोचले. पाटणा उच्च न्यायालयानेही वक्फला जमिनीची कागदपत्रे दाखवण्यास सांगितले. वक्फकडे समाधानकारक उत्तर नव्हते. यानंतर उच्च न्यायालयाने वक्फ आदेशाला स्थगिती दिली.
Powered By Sangraha 9.0