बदलापूर अत्याचार प्रकरण! आरोपी अक्षय शिंदेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

26 Aug 2024 13:28:06
 
Akshay Shinde
 
ठाणे : बदलापूर लैंगिक अत्याचारातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी अक्षय शिंदेला सोमवारी कल्याण कोर्टात हजर करण्यात आले होते. दरम्यान, आरोपीच्या कोठडीत वाढ करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
 
दि. १३ ऑगस्ट रोजी बदलापूरमधील एका शाळेत दोन चिमुकलींवर शाळेतील कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदेला पोलिसांनी अटक करून २६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर २६ तारखेला याप्रकरणाची सुनावणी पार पडली. दरम्यान, अक्षय शिंदेच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
 
हे वाचलंत का? -  नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन!
 
बदलापूरमधील अत्याचाराच्या घटनेने राज्यभरात एकच खळबळ उडाली असून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे. या घटनेतील आरोपी अक्षय शिंदेच्या घराची आणि बदलापूरमधील त्या शाळेची कसून चौकशी करण्यात येत आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0