जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) रविवारी २४ ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील जळगाव येथील लखपती दीदी कार्यक्रमात भाग घेत त्यांनी ११ लाख दीदींना प्रमाणपत्र दिले. या दरम्यान पंतप्रधानांनी या बचत गटांना ५ हजार कोटी रूपयांचे कर्ज जाहीर केले. या मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधानांनी बलात्काराच्या घटनांबद्दल त्यांनी दुख: ही व्यक्त केले आणि महिलांवरील गुन्हे अक्षम्य असल्याचे सांगत त्यांनी महिलांसोबत घडत असलेल्या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. ते जळगावातील लखपती दीदी या कार्यक्रमात बोलत होते.
देशातील महिला आणि मुलींवरील हिंसाचारावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चिंता व्यक्त केली आहे. आज देशातील प्रत्येक राज्यात आपल्या मुलींवर तसेच महिलांवर झालेल्या अन्याय-अत्याचाराचा राग आहे. मी देशातील प्रत्येक राज्यातील सरकारला सांगेल की, महिलांवरील गुन्हे हे अक्षम्य आहेत. दोषी कोणीही असो त्या नराधमाला सोडता कामा नये. सरकार बदलत असते, मात्र महिलांचा सन्मान आणि त्यांचे रक्षण ही आपली जबाबदारी असल्याचे मोदी म्हणाले.
कोलकात्यातील आर जी कर वैद्यकीय विद्यालयात महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टर झालेल्या अमानुष अत्याचारावर आणि बदलापुरात लहान मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारावर पंतप्रधानांनी नाव न घेता भाष्य केले. ते म्हणाले की. महिलांवर होणाऱ्या गुन्ह्यांमध्ये कोणत्याही स्वरूपाची मदत करणाऱ्यांना सोडले जाऊ नये. रूग्णालय असो वा शाळा असो तसेच कार्यालय असो किंवा पोलीस यंत्रणा असो यावर प्रत्येक गोष्टीचा हिशोब घ्यावा लागेल, असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
पुढे नरेंद्र मोदी म्हणाले की, महिलांवर गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांसाठी आम्ही कायदा अधिक मजबूत आणि कठोर करत आहोत. यापूर्वी एफआयआर दाखल होत नसल्याच्या तक्रारी होत्या. आम्ही BNS भारतीय न्यायिक संहिता अंमलात आणले आणि त्यात अनेक सुधारणा केल्या. जर महिलेला पोलीस ठाण्यात जायचे नसल्यास ते एफआऱआय दाखल करू शकतात. एफआरआयमध्ये कोणीही बदल करू शकत नाही. लग्नानंतर काही महिलांवरही अन्याय अत्याचार होतो. महिलांवरील गुन्ह्यासाठी केंद्र सरकार हे राज्य सरकारच्या पाठीशी उभे आहे. त्यानंतर ते म्हणाले की, देशाचे आणि समाजाचे भविष्य घडवण्यासाठी मातृशक्तीचे मोठे योगदान असल्याची माहिती त्यांनी दिली.
सरकार हे महिलांसाठी मुलींसाठी अतोनात प्रयत्न करत आहे. याआधी महिला आणि मुलींवर प्रचंड बंधने होती. आज तिन्ही लष्करात महिला आपले नशीब आजमावत आहेत. फायटर पायलट, ग्रामीण भागात शेती व्यवसाय आणि दुग्धव्यवसाय सांभाळत आहेत.
लखपती दीदी योजनेबाबत पंतप्रधान म्हणाले की, मी लोकसभा निवडणुकी वेळी आलो तेव्हा बचतगटातील ३ कोटी महिलांना करोडपती बनवायचे आश्वासन केले. त्याची वार्षीक कमाई एक लाख रूपयांपेक्षा जास्त असेल असे मी सांगितले होते. गेल्या दहा वर्षात १ कोटी लखपती दीदी तयार झाल्या आणि गेल्या दोन महिन्यात ११ लाख नवीन लखपती दिदी तयार झाल्या आहेत. या महिन्यात १ लाखांहून अधिक लखपती दीदी बनल्या आहेत. महायुती सरकारने यासाठी खूप मेहनत घेतली आहे. महाराष्ट्रात अनेक योजना राबवल्या गेल्या आहेत आणि राबवल्या जातील. लखपती दीदी ही योजना केवळ बहिणी आणि मुलींची कमाई वाढवण्याची मोहिम नाही तर येणाऱ्यां पिढ्यांना सक्षम बनवणारी ही मोहिम आहे.
दरम्यान २०१४ सालापर्यंत सखी मंडळांना १५ हजार कोटी रूपयांहून कमी बँक कर्ज देण्यात आले होते. त्यावेळी गेल्या १० वर्षांमध्ये ९ लाख कोटी रूपये मदत देण्यात आली होती. कुठे २५ हजार कोटी आणि कुठे ९ लाख कोटी एवढेच नाहीतर सरकारने केलेली मदत ही दिसून येते, असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.